प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापूर- स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने धारदार शस्त्रांची विक्री करीत असलेल्या सुनिलसिंग मनोहरसिंग दुधाणे (वय 32.रा.वंदेमातरम कॉलनी,बालाजी टॉकीज जवळ,म्हैसूर कर्नाटक) व गोंविदसिंग भारतसिंग टाक (वय 29.रा.आसरानगर ,निपाणी ता.चिकोडी जि.बेळगाव) या दोघां परप्रांतियांना अटक करून त्याच्या कडील एकूण 27 हत्यारे जप्त करण्यात आली आहे.
वरिष्ठ पोलिस अधिकारी यांनी कोल्हापूर जिल्हयातील सर्व पोलिस ठाण्यातील प्रभारीना आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाला शिवजयंतीच्या अनुशंगाने जिल्ह्यात कोम्बिंग ऑपरेशन आणि ऑपरेशन ऑल आऊट करण्याच्या सूचना दिल्या होत्या.
वरिष्ठांच्या आदेशा प्रमाणे स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलिस निरीक्षक रविंद्र कळमकर आणि त्यांच्या पथकाने बुधवार (दि.19फ़ेब्रु) रोजी शहरात कोम्बिंग ऑपरेशन करीत असताना गोखले कॉलेज ते हॉकी स्टेडियम मार्गावरील विश्वपंढ़री जवळ येथे लाल रंगाची मोपेड गाडी रस्त्याच्या कडेला लावून दोघे जण हत्यारे विक्री करीत असल्याची माहिती मिळाली.
त्याप्रमाणे पोलिस निरीक्षक रविंद्र कळमकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक जालिंदर जाधव,पोलिस कृष्णात पिंगळे,युवराज पाटील,परशुराम गुजरे,अमित सर्जे ,वैभव जाधव आणि राजेश राठोड यांनी सदर ठिकाणी छापा टाकून दुधाणे व टाक यांना पकडून त्यांच्या कडून विक्री साठी आणलेल्या 03 तलवार,3 गुप्त्या,05 खंजीर,02 सत्तुर ,04 कोयते आणि 20 चाकू असे एकूण 27 धारदार व प्राणघातक हत्यारे,मोपेड गाडी आणि रोख रक्कम असा एकूण 91 हजार 600/ रुपये किमंतीचा मुद्देमाल करून त्या दोघांच्या विरोधात जुना राजवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलिस अधीक्षक मा.महेंद्र पंडीत यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलिस निरीक्षक रविंद्र कळमकर ,पोलिस उपनिरीक्षक जालिंदर जाधव यांच्यासह त्यांच्या पथकाने केली.