प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापूर- करवीर तालूक्यातील शिंगणापूर येथे मुलाने वडीलावर तलवार हल्ला केल्याने वडील सदाशिव रामचंद्र तोरस्कर (वय ८२) हे गंभीर जखमी झाले. शिंगणापूर येथे राहणारे सदाशिव रामचंद्र तोरस्कर हे गेली वीस वर्षे आपला नातू रितेश राजेंद्र तोरस्कर यांच्या सोबत राहतात नातू रितेश हा कराटे चॅम्पियन असून तो सध्या अकॅडमी चालवतो .तर तिथेच पलीकडे त्यांचा मुलगा राजेंद्र हा आपल्या आईसोबत राहतो मागील वीस वर्षापासून राजेंद्र ची पत्नी त्याच्यासोबत न राहता तिच्या माहेरी राहते त्यामुळे राजेंद्र आपल्या आईसोबत राहतो मागील काही दिवसापासून राजेंद्र व रितेश या बाप लेखात वाद होता या वादा चा परिणाम काल रात्री मोठ्या भांडणात झाला रितेश राजेंद्र ला घरातून बाहेर हो असे म्हणत असताना त्यांच्या झटापट झाली असता सदाशिव तोरस्कर मुलगा व नातवातील भांडण सोडवण्यासाठी गेले असता मुलाला मारण्यासाठी राजेंद्र उर्फ केरबा तोरस्कर याने मारलेली तलवार वडील सदाशिव यांना लागली व ते गंभीर जखमी झाले त्यांना शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले याबाबत करवीर पोलीस ठाणे गुन्हा दाखल झाला असून राजेंद्र तोरस्कर ला अटक करण्यात आली पुढील तपास करवीरचे पोलीस सरवदे करीत आहेत.