प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापूर-करवीर तालुक्यातील कळंबा येथे 50 रुपयांच्या आणि 500 रुपयांच्या बनावट नोटा छापणाऱ्या दोघांना करवीर पोलिसांनी अटक केली.सिध्देश श्रीकांत घाटगे(दत्तोबा शिंदेनगर ,कळंबा)आणि विकास वसंत पानारी (रा.शिवसुष्टी शांकभरी कॉलनी शिंगणापूर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.या भागात बनावट नोटांची छपाई होत असल्याची माहिती मिळाल्याने मोठी खळबळ उडाली.
पोलिस सुत्रा कडुन मिळालेली माहिती अशी,केंद्र सरकारच्या तपास विभागाला कळंबा येथील सिध्देश घाटगे यांच्या घरात बनावट नोटांची छपाई होत असल्याची माहिती मिळाली असता त्या परिसरात सापळा रचून छापा टाकला असता या वेळी घाटगे परदेशातुन नोटा छपाईचा यंत्र सामुग्री मागवून त्यावर नोटा छपाईचे काम चालू असल्याचे निदर्शनास आले.पोलिसांनी त्यांना अटक करून 50 ,200 आणि 500 रुपयांच्या छपाई केलेल्या काही नोटा व इतर साहित्य जप्त करून सिध्देश याच्याकडे चौकशी केली असता बनावट नोटा व्यवहारात आणणारा पोलिसांनी विकास पानारी यालाही ताब्यात घेऊन अटक केली.काही जण कळंबा परिसरात बनावट नोटा छापतात.याची माहिती येथील पोलिसांना मिळत नाही या बद्दल ग्रामस्थांत आश्चर्य व्यक्त केले जात आहे.