प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापूर-फुलेवाडी येथील बोगस डॉक्टर दगडू बाबूराव पाटील याला गर्भपाताच् या गोळ्यांची विक्री करणारा मेडिकल चालक योगेश शंकर निगवेकर (वय ४२, रा. गंगावेश, कोल्हापूर) याला जुना राजवाडा पोलिसांनी मंगळवारी (दि. ४) अटक केली. त्याला बुधवार (दि.05) रोजी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.आता पर्यत पोलिसांनी या गुन्ह्यातील पाच जणांना अटक केली आहे. मेडिकल चालकास गोळ्यांचा पुरवठा करणा-या व्यक्तीचा शोध चालू असल्याची माहिती जुना राजवाडा पोलिसांनी दिली.
गर्भपाताच्या गोळ्यांची विक्री झाल्याची माहिती मिळताच आरोग्य विभागासह पोलिसांनी फुलेवाडी, जुना बुधवार पेठ आणि जोतिबा डोंगर येथे छापे टाकून कारवाई केली होती. २० डिसेंबर २०२४ रोजी केलेल्या कारवाईत बोगस डॉक्टर दगडू पाटील याच्यासह चौघांना अटक केली. या टोळीला गर्भपाताच्या गोळ्यांची विक्री करणा-या संशयितांचा शोध चालू होता. गंगावेशीतील दत्त मेडिकलचा मालक योगेश निगवेकर यानेच गर्भपाताच्या गोळ्यांची विक्री केल्याचे स्पष्ट होताच पोलिसांनी आज मंगळवार (दि.04) रोजी त्याला घरातून अटक केली. त्याने आता पर्यत किती जणांना आणि किती गोळ्यांची विक्री केली याची चौकशी चालू असल्याचे तपास अधिकारी उपनिरीक्षक महेश पाटील यांनी सांगितले.