प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापूर- लक्ष्मीपुरी येथे गोरक्षनाथ मंदीर जवळ असलेल्या एका झाडावरून गेलेल्या वायरीला नॉयलॉनचा मांज्याचा दोरा अडकला होता.त्या दोऱ्यात घारीचा पाय अडकल्याने तिला उडता येईना.हा प्रकार आज सकाळी नऊच्या तेथून जात असलेल्या विजय चव्हाण या नागरिकांच्या लक्षात आला असता त्याने कोल्हापुर महानगरपालिकेच्या अग्निशामन दलाला माहिती दिली.या विभागाच्या जवानांनी तात्काळ घटना स्थळी धाव घेऊन पायात दोरा अडकून पडलेल्या घारीची मोठ्या कौशल्याने सुटका केल्याने घारीला जिवदान मिळाले .
या कारवाईत अग्निशामन दलाचे जवान पुंडलीक माने,अर्पिता शेलार आणि चालक योगेश जाधव यांनी भाग घेतला.त्यांनी दाखविलेल्या धैर्याचे नागरिकांतुन कौतुक होत आहे.