प्रेस मीडिया लाईव्ह :
कोल्हापूर-गोव्याहून छत्रपती संभाजीनगरच्या दिशेने चाललेल्या खाजगी बसला करवीर तालुक्यातील कांडगाव परिसरात असलेल्या शेरी माळ येथे चालकाचा ताबा सुटून बस पलटी झाली.या झालेल्या अपघातात अमोल परशुराम भिसे (रा.छ.संभाजीनगर ) हे ठार झाले असून 25 पेक्षा जास्त प्रवासी जखमी झाले आहेत.रविवार (दि.02) रोजी रात्रीच्या सुमारास हा अपघात झाला.जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
छ.संभाजीनगर येथील एका कंपनीतील कर्मचारी 30 जानेवारी रोजी खाजगी बस मधून गोवा येथे सहलीला गेले होते.कणकवली येथे जेवण करून ही बस भरधाव वेगाने जात असताना चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने बस पलटी झाली.बस मध्ये अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढ़ण्याचे काम उशिरापर्यत चालू होते.
या घटनेची माहिती पोलिसांना समजताच तेथील ग्रामस्थांच्या वतीने बस मधील प्रवाशांना बाहेर काढ़ले.