बनावट दारु तयार करण्यासाठी लागणारे साहित्य आणि तवेरा गाडी असा एकूण 3 लाख रुपये किमंतीचा मुद्देमाल जप्त.

 

प्रेस मीडिया लाईव्ह :

मुरलीधर कांबळे :

कोल्हापूर- स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने बनावट दारु तयार करण्यासाठी लागणारे स्पिरीट आणि तवेरा गाडी असा एकूण 3 लाख 20 रुपये किमंतीचा मुद्देमाल जप्त करून आरोपी अरुण विष्णु शेवाळे (वय 38.रा.घोडके नगर ,इंचलकरंजी)  याला ताब्यात घेऊन त्याच्यावर शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून त्याला पुढ़ील तपासासाठी शिवाजीनगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.

कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व पोलिस ठाण्यातील प्रभारीना अवैद्य व्यवसाय करीत असलेल्यांच्यावर कारवाई करण्याच्या सूचना वरिष्ठ पोलिस अधिकारी यांनी दिल्या होत्या.त्या  अनुशंगाने स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलिस निरीक्षक रविंद्र कळमकर यांनी दारु तयार करण्यासाठी लागणारे साहित्य ,त्याची विक्री आणि साठा करण्यारया इसमावर कारवाई करण्यासाठी पथके तयार करून अवैद्य दारुवर कारवाई करण्यासाठी माहिती घेत असताना या पथकातील पोलिसांना इंचलकरंजी शहरातील काडापूरे तळ या ठिकाणी  बनावट दारु करण्यासाठी लागणारे स्पिरीटने भरलेली पांढ़री कलर असलेली तवेरा गाडी येणार असल्याची माहिती मिळाली.

या मिळालेल्या बातमीच्या अनुशंगाने पोलिस उपनिरीक्षक शेष मोरे आणि पोलिस पथकाने काडापूरे तळ्याकडे जात असलेल्या मार्गावर सापळा लावून पांढ़री तवेरा गाडी ताब्यात घेऊन त्यात असलेले 20 हजार 400 रुपये किमंतीचे स्पिरीटचे 17 प्लास्टिकचे क्यन मिळून आले.या बाबत चौकशी केली असता सदरचे स्पिरीट विजय भाटले.(रा.घोडकेनगर ,इंचलकरंजी.  सध्या रा.निपाणी ) याच्या मालकीच्या तवेरा गाडीतुन त्याच्या सांगण्यावरून बनावट दारु तयार करण्यासाठी घेऊन जात असल्याची कबुली दिली.

ही कारवाई पोलिस निरीक्षक रविंद्र कळमकर,पोलिस उपनिरीक्षक शेष मोरे पोलिस प्रदिप पाटील,प्रशांत कांबळे,सागर चौगुले ,वैभव पाटील,विशाल खराडे ,महेंद्र कोरवी,योगेश गोसावी,संतोष बर्गे,व अरविंद पाटील यांनी केली.

Post a Comment

Previous Post Next Post