प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापूर- सीपीआर रुग्णालयात नोकरी लावण्याच्या आमिषाने मा.जिल्हाधीकारी यांचा आणि मा.आधिष्ठाता यांच्या नावाचा बनावट सही शिक्का वापरून खोटी नियुक्तपत्रे देऊन दोघांची फसवणूक केल्या प्रकरणी नितीन अशोक कांबळे (रा.क.वाळवा ,ता.राधानगरी) व गणेश एकनाथ कांबळे (रा.शेळेवाडी ,ता.राधानगरी) यांना लक्ष्मीपुरी पोलिसांनी अटक करून त्यांच्यावर फसवणूकीचा गुन्हा दाखल केला.पोलिसांनी या दोघांना आज न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.
राधानगरी तालुक्यातील नितीन कांबळे आणि गणेश कांबळे यांनी संगनमत करून गायत्री जयवंत वारके आणि दिलीप गणपती दावणे यांचा विश्वास संपादन करून कोल्हापूर येथे सीपीआर रुग्णालयात क्लार्क आणि शिपाई म्हणून नोकरी लावतो असे आमिष दाखवून त्यांच्या कडुन वेळोवेळी पैसे घेऊन त्यांची फसवणूक करण्याच्या उद्देशाने त्यांना आयुक्त मा.जिल्हा विभाग रुग्णालय ,कोल्हापूर.यांना शिफारस केल्याचे नियुक्तपत्र तयार करून त्याच्यावर सीपीआरचे आधिष्ठाता मा.डॉ.एस.एस.मोरे आणि कोल्हापूरचे जिल्हाधिरी मा.अमोल येडगे यांचा बनावट सही आणि शिक्का असलेले नियुक्तपत्र देऊन फसवणूक केल्या प्रकरणी सीपीआर रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ.गिरीश कांबळे यांनी लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती.दिलेल्या फिर्यादी नुसार कांबळे यांच्यावर लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदरचा गुन्हा दाखल होताच पोलिसांनी तात्काळ नितीन कांबळे आणि गणेश कांबळे या दोघांना अटक केली.पोलिसांनी शुक्रवार (दि.07) रोजी न्यायालयात या दोघांना हजर केले असता न्यायालयाने पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.
ही कारवाई पोलिस अधीक्षक मा.महेंद्र पंडीत ,अप्पर पोलिस अधीक्षक श्रीमती जयश्री देसाई,शहर उपविभागीय पोलिस अधिकारी अजित टिके यांच्या मार्गदर्शनाखाली लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक श्रीराम कन्हेरकरसो,पोसई खंडेराव गायकवाड ,पोलिस गजानन परीट ,प्रितम मिठारी,मंगेश माने आणि किशोर पवार यांनी केली.
या दोघांच्या कडुन नोकरी लावतो म्हणून कुणाची फसवणूक झाली असल्यास त्यांनी लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यात तक्रार द्यावी.असे आवाहन पोलिस निरीक्षक श्री.कन्हेंरकरसो ,यांनी फसवणूक झालेल्या नागरिकांना केले आहे .