पोलिसांना साडे तेरा लाख रुपयांची फसवणूक केल्या प्रकरणी सांगलीतील एकास अटक .

स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाची कारवाई.आणखी काहीची नावे चर्चेत.

प्रेस मीडिया लाईव्ह :

मुरलीधर कांबळे :

कोल्हापूर - काही पोलिस कर्मचारी यांना  राज्य महामार्ग वाहतूक पथकाकडे बदली करण्याची आमिषाने कोल्हापूर पोलीस दलातील एका  हवालदारासह सहा पोलिसांना 13 लाख 60 हजाराची फसवणूक केलेला  मुख्य सूत्रधार मनोज सबनीस याचा  साथीदार संतोष यशवंत खरात (वय 27.रा. सांगलीवाडी)  यास स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने  मंगळवारी पहाटे छापा टाकून अटक केली.

पोलिसांच्या बदली फसवणूक प्रकरणात संशयित संतोष खरात याचा सहभाग असल्याचे पोलिसांच्या चौकशीत निष्पन्न झाले आहे.

या  फसवणुकीच्या कटात संतोष खरात यांच्यासह सांगली मिरजेतील आणखी काही तरुणांची नावे निष्पन्न झाले आहेत पोलीस त्यांचा शोध घेत असल्याची  माहिती  स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलिस निरीक्षक  रवींद्र कळमकर ,उपनिरीक्षक जालिंदर जाधव यांनी सांगितले.

मुख्य संशयित मनोज सबनीस ( रा. तारदाळ, ता. हातकणंगले ) याने हवालदरासह पोलिसांकडून घेतलेले पैसे संतोष खरात याच्या बँक खात्यावर ऑनलाइन जमा केल्याचेही चौकशीत निष्पन्न झाले आहे. फसवणूक प्रकरणी संतोष खरात याचा सहभाग निष्पन्न झाल्यानंतर पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर उपनिरीक्षक जालिंदर जाधव यांच्या पथकाने सांगली (सांगलीवाडी) येथील त्याच्या घरावर छापा टाकून त्यास ताब्यात घेतले पहाटे ही कारवाई झाली. खरात याच्या प्राथमिक चौकशीत टोळीतील आणखी काही तरुणांची नावे पुढे आले आहेत संबंधितांना लवकरच ताब्यात घेण्यात येणार असल्याचे कळमकर यांनी सांगितले. 

मंत्री, लोकप्रतिनिधी आणि पोलीस दलातील वरिष्ठ अधिकाराशी सलोख्याचे संबंध असल्याचा बहाणा करून सबनीसह त्याच्या साथीदाराने कोल्हापूरसह अन्य जिल्ह्यात अनेक पोलिसांची फसवणूक केली असावी असा संशय तपास अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे 

कोल्हापूर दलातील सहा पोलिसांची राज्य महामार्ग वाहतूक पथकात बदली करतो असे सांगून संशयित आणि फिर्यादी प्रमोद बेनाडे या हवलदारासह सहा पोलिसांकडून तेरा 60 हजार रुपये उकळले आहेत हा प्रकार नुकताच चव्हाट्यावर आला आहे 

शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे मुख्य संशयित मनोज सबनीस याची वरिष्ठ स्तरावर चौकशी सुरू आहे या प्रकरणातून मोठे रॅकेट चव्हाट्यावर येण्याची शक्यताही वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post