अल्पवयीन मुलीचा पाठलाग करून त्रास देणाऱ्या तरुणावर पोलिसात गुन्हा.

 

प्रेस मीडिया लाईव्ह :

मुरलीधर कांबळे :

कोल्हापूर- अल्पवयीन मुलीचा सतत पाठलाग करून त्रास त्रास देणाऱ्या अबुबक्र जुबेर शेख (वय 20.रा.घ.नं.252 ,प्रगतीनगर ,पाचगाव ) याच्या विरोधात पीडीत मुलीच्या आईने जुना राजवाडा पोलिस ठाण्यात फिर्याद दिल्याने पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

यातील फिर्यादी या मुळच्या बिरदेव मंदीर ,हुपरी येथील असून सध्या पाचगाव येथील पोवार कॉलनीतील सावंत यांच्या घरी भाड्याने रहातात.यातील पीडीत मुलगी ही अल्पवयीन आहे.हे माहित असुनही अबुबक्र शेख हा वारंवार सावंत यांच्या घरी जाऊन त्याच प्रमाणे संशयीत हा पीडीत मुलीचा  पाठलाग करून माझेशी बोल असे सांगून मंगळवार (दि.18 फ़ेब्रु) रोजी सव्वा नऊच्या सुमारास पीडीत मुलीच्या इच्छेविरुध्द सिध्दाळा गार्डन येथे नेऊन तिच्याशी भांडण तंटा करून मारहाण केली.हा प्रकार पीडीतेच्या घरी समजताच पीडीत मुलीच्या आईने याची  फिर्याद दिल्याने जुना राजवाडा पोलिसांनी अबुबक्र शेख यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याचा पुढ़ील तपास जुना राजवाडा पोलिस ठाण्याचे सहा. पोलिस निरीक्षक पाटोळे करीत आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post