प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापूर- मंगळवार पेठेतील जयप्रभा स्टुडिओ येथे बांधकामा ठिकाणी इलेक्ट्रीक शॉक लागून अरविंद संजय मौर्य (वय03.रा.जयप्रभा स्टुडिओ,मंगळवार पेठ को.मुळ गाव मध्यप्रदेश) या लहान मुलाचा मृत्यु झाला.हा प्रकार मंगळवार (दि.25) रोजी सकाळी साडे अकराच्या सुमारास घडला.या घटनेची नोंद सीपीआर पोलिस चौकीत झाली आहे.
जयप्रभा स्टुडिओ ,मंगळवार पेठ परिसरातील एका अपार्टमेंट मध्ये बांधकाम चालू आहे.त्या ठिकाणी अरविंद याला तेथे असलेल्या एका खोलीत झोपवून त्याचे आई वडील वरील मजल्यावर काम करीत होते.अरविंद याला जाग आल्यावर तो खोलीच्या बाहेर आला असता तेथे खाली पाण्यात पडलेल्या वायरला त्याचा पाय लागल्याने त्याला शॉक लागला .हा प्रकार त्याच्या नातेवाईकांच्या लक्षात येताच बेशुध्दावस्थेत उपचारासाठी सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले असता त्याचा उपचारापूर्वी मृत्यु झाला.अशी माहिती त्याच्या नातेवाईकांनी दिली.