प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापूर- सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आजगाव ,येथील गोवा बनावटीची दारुची वाहतूक करणाऱ्या डॅरेल एलेक्स फर्नाडिस (वय 21) याला राज्य उत्पादन शुल्क विभागाने त्याला ताब्यात घेऊन त्यांच्या कडील 5 लाख रुपये किंमतीची गोवा बनावटीची दारु आणि वापरात असलेली मोटार असा एकूण 10 लाख रुपये किमंतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
राज्य उत्पादन शुल्क विभागाला हॉकी स्टेडियम ते सायबर चौक या मार्गावर गोवा बनावटीची दारुची वाहतूक होत असल्याची माहिती मिळाली असता या भागात पाळत ठेवून कारवाई केल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पोलिस अधीक्षक स्नेहलता नरवणे यांनी दिली.
जप्त केलेली गोवा बनावटीची दारु कुठून आणि कुणासाठी आणली यांची चौकशी चालू असल्याचे सांगितले.जप्त केलेल्या मोटारीत विविध कंपन्यांची 750 मिली.चे 40 बॉक्स आणि 180 मिली.चे 35 बॉक्स निदर्शनास आले.