प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापूर- मटका किंग सम्राट कोराणे हा गेलया पाच वर्षांपासून फरारी झाला होता.तो बुधवारी स्वतःच न्यायालयात हजर झाला.न्यायालयाने त्याला न्यायालयीन कोठडी सुनावल्याने त्याची कंळबा कारागृहात रवानगी करण्यात आली.पोलिसांनी कोराणे याला ताब्यात घेण्यासाठी विशेष मोका न्यायालयात गुरुवारी अर्ज दाखल केला असून त्या अर्जावर शुक्रवारी सुनावणी होणाची शक्यता आहे.
आज जर न्यायालयाचा आदेश झाला तर त्याला ताब्यात घेण्यासाठी पोलिस यंत्रणा सज्ज आहे.मटका किंग कोराणे यांच्यासह मुंबईतील सावला यांच्या बरोबर 44 जणांच्यावर तत्कालीन पोलिस अधीक्षक अभिनव देशमुख व तत्कालीन पोलिस उपअधीक्षक कट्टे यांनी मोकाची कारवाई केली होती.या अगोदर पोलिसांनी 42 जणांना अटक केली असून कोराणे आणि सावला हे फरार झाले होते .त्यांचा जामीन अर्ज न्यायालयाने फ़ेटाळल्यामुळे तसेच पोलिसांनी पुन्हा तपास चालू केल्यामुळे बुधवारी न्यायालयात कोराणे स्वतःच हजर झाला.न्यायालयाने त्याची कंळबा कारागृहात रवानगी केली .
कोराणे हा गेल्या पाच वर्षांपासून कुठे आणि कुणा -,कुणाकडे आश्रयाला होता.याची पोलिस माहिती घेत आहेत.पोलिस अधीक्षक मा.महेंद्र पंडीत यांनी यात दोषी असलेल्यांची चौकशी करून कडक कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत.त्यामुळे त्याच्याकडे ऊठबस असलेल्यांचे धाबे दणाणले आहेत.