इंडियन पोलीस मित्र संघटना तालुका यांना आमदार डॉ .अशोकराव माने (बापू ) यांच्या हस्ते ट्रॉफी देऊन सत्कार करण्यात आला .
प्रेस मीडिया लाईव्ह :
सौ. प्रमोदिनी माने :
हिंदवी बहुउद्देशीय सेवाभावी संस्था हातकणंगले यांचे वतीने रविवार दिनांक 23/02/2025 इ रोजी मॅरेथॉन स्पर्धा 2025 आयोजित केली होती या स्पर्धेसाठी वाहतूक नियंत्रणासाठी इंडियन पोलीस मित्र हातकणंगले तालुका यांचे वतीने या सेवा देण्यात आली .
या बंदोबस्तासाठी हातकणंगले तालुकाध्यक्ष सुभाष कुंभार यांच्या अध्यक्षतेखाली इंडियन पोलीस मित्र सुनील भारमल सर ,शकील जमादार सर , प्रकाश नाडे सर ,शशिकांत बामणे सर ,संदीप सैसाले सर ,व गणेश पाटील सर या सर्वांनी अतिशय उत्कृष्ट अशी सेवा बजावल्याबद्दल संस्थेच्या वतीने इंडियन पोलीस मित्र संघटना तालुका यांना हातकणंगले मतदारसंघाचे विद्यमान आमदार डॉ .अशोकराव माने (बापू ) यांच्या हस्ते ट्रॉफी देऊन सत्कार करण्यात आला .
यावेळी या कार्यक्रमासाठी कोल्हापूर जिल्हाध्यक्ष संभाजी पाटील सर यांनी भेट देऊन मार्गदर्शन केले. संस्थेचे आयोजक मा राहुल मोरे यांनी संघटनेचे आभार मानले.