प्रेस मीडिया लाईव्ह :
सौ प्रमोदिनी माने :
कोडोली ता , पन्हाळा जि कोल्हापूर अंबाबाई गल्ली येथे राजमात जिजाऊ ग्रुप च्या शिवजयंती उत्साहात पार पडली सकाळी महाराजांना पुष्प हार प्रमुख पाहुण्याच्या हस्ते घालण्यात आला प्रमुख पाहूणे कोडोलीच्या सरपंच सौ शिल्पा झेंडे मॅडम सौ कांचन खंबाळे मॅडम प्रा . सौ प्रमोदिनी माने मॅडम उपस्थित होत्या .
बालचमूनी शिवजयंती उत्साहात साजरी केली याच कौतुक सौ झेंडे मॅडम यांनी केल कांचन खंबाळे मॅडम यांनी बालशिवाजी चा इतिहास मुलांसमोर सादर केला उपस्थितांचे स्वागत रुपाली यादव व सुंनदा पाटील यांनी केल अंबाबाई गल्ली येथील सर्व महिला उपस्थित होत्या यांनंतर प्रमोदिनी माने मॅडम या मार्गदर्शन करताना म्हणाला आज मोबाईल च्या युगात अडकलेली पिढी व स्त्रत झालेले पालक आपण पाहतो पण अंबाबाई गल्लीतील मुलांचे व पालकांचे विशेष कौतुक आहे कारण ही मुल शिवविचाराने प्रेरीत आहेत .
शिवजयंती सारखे उत्सव साजरे करताना मुलानां प्रेरणा देणे गरजेचे आहे तर मावळे तयार होतील मुलांनी मैदानी खेळाला महत्व देणे गरजेचे आहे तरच पुढीची पिढी मनाने निरोगी राहील आज मुल्यांच्या एकलकोंडा , निराशा जिवन संपवनाची भावना मनामध्ये घर करत आहे त्यामुळे आपले सण वार परंपरा व इतिहासाची माहिती असने गरजेचे आहे सर्व चांगल्या विचारांना उजाळा देण्याकरीता जंयती व पुण्यतिथी होणे गरजेचे आहे असे प्रतिपादन केले सांयकाळी राजामाता ग्रुपच्या मुला मुलीनी छ शिवाजी महाराज व जिजाऊ यांची वेशभूषा परिधान केली व हलगीच्या वाध्यात महारांजाची अंबाबाई मंदीर ते छत्रपती चौकात मिरवून काढली
. उत्कर्ष भोसले या छोट्या मावळ्याने डाल तलवारीचा खेळाचे उत्तम प्रदर्शन केले तर शौर्य शिंदे याने लाटीकारी चे उत्तम पदर्शन केले सानवी देशमूख शिवचरीत्र सांगितले यावेळी मोलाची साथ सुनंधा पाटील रुपाली यादव केकरे काकी , प्रियंका कदम ' निकम वहीनी यांची मिळाली राजमाता ग्रुपच्या मुलांनी एकत्र भोजनांचा स्वाद घेतला व नव विचारांना चालना दिली