प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
जयसिंगपूर - जयसिंगपूर येथे नोकर हौसिंग सोसायटी येथील असलेल्या पाण्याच्या टाकी जवळ मोकळ्या जागेत सोमवार (दि.24 फ़ेब्रु) रोजी दुपारी साडे पाचच्या सुमारास गांजा ओढ़ताना आढ़ळल्याने जयसिंगपूर पोलिसांनी शुभम भरत भोसले (वय 23.रा.नोकर हौसिंग सोसायटी,जयसिंपूर ) याच्यावर कायदेशीर कारवाई केली.याची फिर्याद वैभव लक्ष्मण सुर्यवंशी (जयसिंगपूर पोलिस) यांनी जयसिंगपूर पोलिस ठाण्यात दिली.
ही कारवाई पोसई किशोर अंबूडकर ,पोलिस संतोष जाधव ,ताहीर मुल्ला आणि बाळासो गुत्ते कोळी यांनी केली असून याचा पुढ़ील तपास पोसई किशोर अंबूडकर हे करीत आहेत.
Tags
जयसिंगपूर