प्रबोधिनीत शांतारामबापूंना अभिवादन

प्रेस मीडिया लाईव्ह :

इचलकरंजी ता.१६ समाजवादी प्रबोधिनीचे संस्थापक सरचिटणीस आणि थोर विचारवंत स्वातंत्र्यसैनिक आचार्य शांतारामबापू गरूड यांनी संपूर्ण आयुष्य सर्वांगीण समतेच्या विचाराला वाहून घेऊन काम केले. त्याच भूमिकेतून त्यांनी १९७७ साली शास्त्रीय समाजवादाचे खुले ज्ञानपीठ असलेल्या समाजवादी प्रबोधिनीची स्थापना आपल्या सहकाऱ्यांसह केली. त्याद्वारे प्रारंभापासून  भारतीय राज्यघटनेचे तत्त्वज्ञान आणि त्याची व्यापकता हा विषय लोकप्रबोधनाच्या केंद्रस्थानी आणला. तसेच राजकीय पक्षांच्या आणि सामाजिक - राजकीय कार्यकर्त्यांच्या विचारविश्वातही तो अग्रक्रमाने आणला.

त्याशिवाय भारतीय संस्कृतीसह गांधीवाद, मार्क्सवाद, लोकशाही समाजवाद इत्यादी विचारधारांचे प्रबोधन केले. समाज समाजवादी प्रबोधिनीच्या वतीने चाळीस वर्षांपूर्वी 'प्रबोधन वाचनालय ' सुरू केले. तर पस्तीस वर्षांपूर्वी 'प्रबोधन प्रकाशन ज्योती 'हे मासिक सुरू केले. तसेच विविध विषयांवर हजारो व्याख्याने,सभा ,मेळावे यांचे आयोजन करून लोकप्रबोधन केले. त्यांनी अंगीकारलेले समतावादी विचारधारेचे काम अधिकाधिक व्यापक करणे ही काळाची गरज आहे. त्यासाठी सर्व जिज्ञासुंनी कटिबद्ध राहणे हीच त्यांना आदरांजली ठरेल असे मत समाजवादी प्रबोधिनीचे सरचिटणीस प्रसाद कुलकर्णी यांनी व्यक्त केले. ते आचार्य शांताराम गरुड यांना ९८ व्या जन्मदिनी अभिवादन करताना आणि प्रबोधन प्रकाशात ज्योती मासिकाच्या फेब्रुवारी २०२५ अंकाच्या प्रकाशना वेळी बोलत होते.

 प्रारंभी शशांक बावचकर व अभिजीत पटवा यांच्या हस्ते आचार्य शांतारामबापू यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी अजितमामा जाधव ,प्रा. रमेश लवटे,रामदास कोळी, अजित मिणेकर, पांडुरंग पिसे , नंदकिशोर जोशी,संजय भस्मे,महेंद्र जाधव, विनोद जाधव ,बाळासाहेब नरशेट्टी , सौदामिनी कुलकर्णी, नंदा हालभावी यांच्यासह अनेकांनी आचार्य शांताराम गरुड यांना आदरांजली वाहिली.

.

Post a Comment

Previous Post Next Post