मराठा मंडळाचे शिवजयंती गुणवंत शिक्षक गौरव पुरस्कार जाहीर

 

प्रेस मीडिया लाईव्ह :

इचलकरंजी/प्रतिनिधी : 

युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधत येथील मराठा मंडळाच्या वतीने दरवर्षी विविध विभागातील गुणवंत शिक्षकांचा पुरस्कार देऊन गौरव करण्यात येतो. यंदाही 19 फेब्रुवारी शिवजयंती निमित्त देण्यात येणार्‍या पुरस्कारांची घोषणा करण्यात आली असल्याची माहिती मराठा मंडळाचे अध्यक्ष आनंदा उदाळे यांनी दिली.

हा पुरस्कार वितरण सोहळा शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला म्हणजे मंगळवार 18 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 5.30 वाजता मराठा मंडळ येथे संपन्न होणार आहे. माजी आमदार अशोकराव जांभळे यांच्या शुभहस्ते व ज्येष्ठ सनदी अधिकारी इंद्रजित देशमुख,  वसंतराव पाटील व संभाजीराव काटकर  यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे.

यंदाच्या पुरस्कारासाठी जीवनगौरव पुरस्कार : विठ्ठल आप्पा चोरगे (माजी प्राचार्य गोविंदराव ज्युनिअर कॉलेज). कॉलेज विभाग : प्रा. दिलीप शाामराव भोसले (ंसंभाजीराव माने ज्युनिअर कॉलेज रुकडी). हायस्कूल विभाग : श्रीकांत चव्हाण (मथुरा हायस्कुल), पांडुरंग हजगुळकर (सरस्वती हायस्कूल), सौ. वैशाली पवार (बालाजी हायस्कुल). प्राथमिक विभाग : पांडुरंग शिऊडकर (हु.बाबु गेनु विद्यामंदिर 28), सौ. मंगल चौगुले (पु.साने गुरुजी विद्या मंदिर), सौ. संगिता पाटील (अशोका हायस्कुल). बालवाडी विभाग : सौ. गीता कचरे (सईबाई बालमंदिर). शिक्षकेत्तर कर्मचारी विभाग : रामचंद्र माने (गंगामाई हायस्कुल) यांची निवड करण्यात आली आहे.

तज्ज्ञ समितीच्या माध्यमातून या निवडी करण्यात आल्या आहेत. याप्रसंगी उपाध्यक्ष सचिन हळदकर, सचिव आनंदा वाझे, खजिनदार विजय सावंत, संचालक राजाराम लोकरे, सुनिल शेलार, वसंतराव मुळीक, राजेंद्र बचाटे, उल्हास सुर्यवंशी, सुहास जांभळे, संभाजी खवरे, प्रकाश नेमिष्टे, दादासो पाटील, गणेश घाटगे आदींसह कार्यालयीन सचिव सचिन रणदिवे उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post