प्रेस मीडिया लाईव्ह :
इचलकरंजी महानगरपालिकेच्या वतीने बुधवार दि. १९ फेब्रुवारी रोजी महाराष्ट्राचे आराध्य दैवत *छत्रपती शिवाजी महाराज* यांच्या जयंती निमित्त शिवतीर्थ येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारुढ पुतळ्यास तसेच के.एल.मलाबादे चौक येथील राज्याभिषेक सोहळा फलकास आणि छत्रपती शिवाजी उद्यान येथील अर्ध पुतळ्यास आयुक्त पल्लवी पाटील यांच्या हस्ते आणि आमदार डॉ. राहुल आवाडे,माजी आमदार प्रकाशराव आवाडे, अतिरिक्त आयुक्त सुषमा शिंदे, उपायुक्त स्मृती पाटील, पोलिस उप अधीक्षक समीर साळवे यांच्या प्रमुख उपस्थितीत पुष्पहार अर्पण करून अभिवादन करणेत आले. याचबरोबर महानगरपालिका बालवाडी विभागाच्या वतीने छत्रपती शिवाजी उद्यान येथे शिव जन्मोत्सव सोहळा संपन्न झाला.
*याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून महाराष्ट्र शासनाने १ फेब्रुवारी २०२३ रोजी महाराष्ट्र राज्य गीत म्हणून अंगिकारणेत आलेल्या महाराष्ट्र राज्यगीत ( गर्जा महाराष्ट्र माझा) गायण कार्यक्रम मान्यवरांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात संपन्न झाला*
याप्रसंगी अशोकराव स्वामी, प्रकाश दत्तवाडे, माजी उपनगराध्यक्ष बाळासाहेब कलागते, तानाजी पोवार, प्रकाश मोरबाळे, रवी रजपुते , पुंडलिक भाऊ जाधव, मोश्मी आवाडे, सहा. आयुक्त रोशनी गोडे , विजय राजापुरे, आरोग्य अधिकारी डॉ. सुनिलदत्त संगेवार, प्रशांत आरगे, क्रीडा अधिकारी संजय शेटे, सदाशिव शिंदे, सदाशिव जाधव, प्रदीप झमरी, संपत चव्हाण, संजय कांबळे, आनंदा मकोटे, यांचेसह मोठ्या प्रमाणात शालेय विद्यार्थी आणि शहरवासीयांची उपस्थिती होती.