हेरले येथे तिन्ही शाळेच्या वतीने व विविध ठिकाणी शिवजयंती उत्साहात साजरी

 


प्रेस मीडिया लाईव्ह :

 प्रतिनिधी /  संदीप कोले 

 रयतेचे राजे, कुळवाडी भूषण, बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती हातकणंगले तालुक्यातील हेरले येथे केंद्रशाळा, शाळा नंबर दोन, व कन्या शाळेच्या वतीने मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात आली या कार्यक्रम प्रसंगी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे  पूजन  केंद्राचे हेरले केंद्रप्रमुख शहाजी पाटील, कन्या शाळेचे मुख्याध्यापक भारती कोरे यांनी केले. तसेच शाळा नंबर दोन चे मुख्याध्यापक प्रभाकर चौगुले यांनी श्रीफळ वाढवले. या कार्यक्रम प्रसंगी शाळेतील विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर भाषण, गाणी सादर करण्यात आले. यावेळी शाळेच्या वतीने सर्वांना शिवजयंती निमित्त शिवरायांना अभिवादन व शुभेच्छा देण्यात आल्या. कार्यक्रम प्रसंगी तिन्ही शाळेचे अध्यापक व अध्यापिका विद्यार्थी व विद्यार्थिनी उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post