' हर मन संविधान ' यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत - प्रसाद कुलकर्णी यांचे प्रतिपादन

 

प्रेस मीडिया लाईव्ह :

गडहिंग्लज ता.२६ भारतीय राज्यघटना आणि तिचे तत्त्वज्ञान अतिशय उत्तम आहे. तसेच ते सर्वांगीण समतेच्या दिशेने नेणारे आहे.म्हणूनच त्याची अंमलबजावणी योग्य पद्धतीने केली गेली पाहिजे. उक्तीत संविधानाचा जयजयकार आणि कृतीमध्ये त्याच्या तत्त्वांची मोडतोड होता कामा नये. यासाठी प्रत्येक नागरिकांनी कटिबद्ध राहिले पाहिजे. भारतीय राज्यघटनेच्या अमृत महोत्सवी वर्षात संविधान गौरव महोत्सव साजरा करीत असताना 'हर घर संविधान मोहिमेप्रमाणे आदरपूर्वक हर मन संविधान' यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत असे मत समाजवादी प्रबोधिनीचे सरचिटणीस  प्रसाद कुलकर्णी यांनी व्यक्त केले. ते समाजवादी प्रबोधिनीची गडहिंग्लज शाखा  व डॉ. घाळी कॉलेजचा राज्यशास्त्र विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यक्रमात 'भारतीय संविधान आणि वर्तमान' या विषयावर बोलत होते.अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा  डॉ. दत्ता पाटील होते. 

स्वागत व प्रास्ताविक  सातप्पा कांबळे तर पाहुण्यांचा परिचय प्रा. डॉ. शशिकांत संघराज यांनी करुन दिला.


मान्यवरांच्या हस्ते रोपट्याला पाणी घालून या कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. प्रारंभी जीवनगौरव पुरस्कार मिळाल्याबद्दल प्राचार्य साताप्पा कांबळे यांचे, डॉ. घाळी कॉलेजच्या प्राचार्यपदी निवड झाल्याबद्दल प्रा. डॉ. दत्ता पाटील, शिवाजी विद्यापीठ सिनेट सदस्यपदी निवड झाल्याबद्दल प्रा. डॉ. नागेश मासाळ, आदर्श शिक्षिका पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल सौ. उर्मिला कदम यांचा,गडहिंग्लज तालुका कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटना अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल प्रा. शिवाजीराव होडगे यांचे, पीएचडी पदवी संपादन केल्याबद्दल डॉ. धर्मवीर क्षीरसागर यांचा समाजवादी प्रबोधिनीच्या वतीने सत्कार करण्यात आला.


प्रसाद कुलकर्णी म्हणाले,जगातील सर्वात महत्वाचा सामाजिक दस्तऐवज म्हणून भारतीय संविधानाला ओळखले जाते. 

 घटना समितीचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र प्रसाद आणि मसुदा समितीचे अध्यक्ष व राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर  यांच्यासारख्या विद्वान लोकांनी घटना समितीच्या सहकाऱ्यांच्या सहकार्याने भारतीय राज्यघटना तयार केली. घटनेच्या माध्यमातून प्रत्येक भारतीयांना मूलभूत हक्क मिळवून दिला. राज्यघटनेच्या माध्यमातून मताचा अधिकार,स्त्री पुरुष समानता, धर्मनिरपेक्षता, लोकशाही, गणराज निर्माण करण्याचा प्रयत्न केला. माणसातील माणूस पण विकसित केले. पण अलिकडे काही विघातक विकृती राज्यघटनेच्या तत्त्वज्ञानावर जाणीवपूर्वक आघात करीत आहेत. संघराज्य एकात्मतेला आणि लोकशाही व्यवस्थेला धक्का पोहोचवत आहेत. माफिया भांडवलशाही,  महागाई, बेरोजगारी, गुन्हेगारी यांची वाढ होणे देशहिताचे नाही.तसेच ते संविधान रक्षणही नाही. म्हणूनच सर्वसामान्य माणसांनी संविधान साक्षर होणे, त्यातील तत्त्वांचा असे गांभीर्यपूर्वक जाणून घेणे व तो व्यक्तिगत कौटुंबिक सामाजिक जीवनात आणण्याचा प्रयत्न करणे अतिशय गरजेचे आहे.


कार्यक्रमास उप प्राचार्य डॉ.एन. बी. मासाळ, डॉ. सरला अरबोळे, सुभाष घुमे, साताप्पा कांबळे , प्रा.डॉ.काशिनाथ तनंगे ,प्रा. शिवाजी होडगे, प्रा.अनिल उंदरे,प्रा.आप्पासाहेब कमलाकर , ईश्वर दावणे, डॉ.निलेश शेळके, प्रा.सचिन जानवेकर, कॉ.उज्वला दळवी,वसुंधरा सावंत, शारदा आवळकर, प्रा. अंबाजी कुलकर्णी, प्रा. प्रीती साहू यांच्यासह  विविध मान्यवर, महाविद्यालयाचे  प्राध्यापक, प्रशासकीय कर्मचारी, आणि विद्यार्थी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.आभार प्रा. दयानंद महाडिक यांनी आभार मानले. हेमा दोडके यांनी सूत्रसंचालन केले.

Post a Comment

Previous Post Next Post