प्रेस मीडिया लाईव्ह :
चंद्रशेखर पात्रे :
देहूरोड दि:- आंबेडकर चळवळीतील कार्यकर्ते युवराज अंकुश कांबळे यांच्या काल शोकाकुल वातावरणात देहुरोडच्या स्मशानभूमीत अंत्यविधी करण्यात आला. युवराज अंकुश कांबळे हे मागील अनेक दिवसांपासून आजारी होते पाच दिवसांपुर्वी अत्यंत त्रास झाल्याने त्यांना पिंपरी चिंचवडच्या यशवंतराव चव्हाण रुग्णालयात अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले होते उपचार घेत असताना पहाटे चारच्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला युवराज अंकुश कांबळे यांचे निधनाची बातमी कळताच देहुरोड शहर शोकाकुल पसरले युवराज अंकुश कांबळे हे आंबेडकर चळवळीतील अंकुश कांबळे यांचे पुत्र होते युवराज कांबळे हे इलेक्ट्रॉनिक वस्तू चे उत्तम आणि अनुभवी कारागीर होते दुर संच (टी व्ही), शीत कपाट, मिक्सर, ग्राइंडर यांचे ते कुशल कारागीर होते अत्यंत अल्पदरात ते काम करून लोकांना देत असे तसेच ते एक उत्तम ढोलीबाजा वाजंत्री देखील होते त्यांचा दुःखद निधनाची बातमी कळताच सर्व क्षेत्रातील मान्यवर अंत यात्रेत सहभागी झाले होते.
या वेळी श्रद्धांजली अर्पण करतांना भारतीय संविधान सन्मान समिती चे अध्यक्ष डॉ रामदास ताटे, भारतीय बौद्ध महासभेचे शहर अध्यक्ष संजय आगळे रिपब्लिकन पक्षाचे जेष्ठ नेते दिलीप कडलक, राहुल गायकवाड धम्म भुमी सामाजिक संस्थेचे अध्यक्ष के एच सुर्यवंशी जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते राजाराम अस्वरे दादा ह्युमन राईट्स फाॅर प्रोटेक्शन चे राष्ट्रीय अध्यक्ष एम डी चौधरी देहूरोड शहर शिवसेना (शिंदे गट) अध्यक्ष दिपक चौगुले भारतीय बौद्ध महासभेचे प्रकाश कांबळे बौद्धाचार्य उत्तम हिंगे गुरूजी यांनी श्रद्धांजली वाहिली, यावेळी सामाजिक धार्मिक चळवळीतील नेते परशुराम दोडमणी मानव आधार सामाजिक संघटनांचे राज्य उपाध्यक्ष बाबु हिरमेठकर रिपब्लिकन पक्षाचे शहराध्यक्ष अरविंद गायकवाड कार्याध्यक्ष सुनील गायकवाड भारतीय संविधान सन्मान समिती चे खजिनदार विजय पवार सह सचिव चंद्रशेखर पात्रे समन्वयक व मनसे नेते मोझेस दास, सदस्य बाबु टेक्केल व अनेक महिला यावेळी उपस्थित होते. युवराज अंकुश कांबळे हे अविवाहित होते त्यांच्यामागे दोन भाऊ तीन बहीण असा मोठा परिवार आहे दिवंगत युवराज अंकुश कांबळे हे जेष्ठ पत्रकार विशाल संविधान चे सह संपादक अशोक अंकुश कांबळे यांचे बंधू होत.