जपान येथे खेळल्या जाणाऱ्या नेत्रहीन फुटबॉलच्या सायतना कप सामन्यासाठी देहुरोडच्या माई बाल भवन संस्थेच्या तीन मुलीचे निवड.

पुढील वाटचालीसाठी साठी खेळाडुवर अनेक स्तरावरून अभिनंदनाचा वर्षाव.

प्रेस मीडिया लाईव्ह :

चंद्रशेखर पात्रे :

देहुरोड दि. :- जपान येथे खेळल्या जाणाऱ्या नेत्रहीन मुलींच्या सायतना कप साठी भारताच्या वतीने सहा मुलीचे निवड करण्यात आली आहे. हा मैत्रीपूर्ण सामना १५ फेब्रुवारी रोजी सायडेन केमिकल एरिना सायतमा नाॅर्मलयझेशन कप साठी हे सामना होणार आहे तर आज १४ आणि १६ फेब्रुवारी रोजी जपान विरूद्ध दोन मैत्री पुर्ण सामना आहे.

महिला नेत्रहीन फुटबॉल संघाचे २६ ते ३१ जानेवारी दरम्यान पर्यंत सराव घेण्यात आले या सरावात एकुण १८ मुलीनी भाग घेतला होता यातील सहा मुलींची निवड करण्यात आले. तर देहुरोड मामुर्डी येथील माई बाल भवनाच्या तीन मुलीचे निवड करण्यात आली या मध्ये कोमल गायकवाड, भाग्यश्री रुग्गी,व स्वाती माने हे तीन मुली जपान या देशात फुटबॉल सामने खेळणार आहेत. ही आनंदाची वार्ता कळताच या माई बाल भवनाच्या मुलीनं वर अनेक स्तरावरून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे या नेत्रहीन मुलीनी फुटबॉल चा सरावा साठी खुपच मेहनत घेतली आहे व हे भारताच्या वतीने प्रतिनिधित्व करणार आहे मागील स्पर्धेत भाग घेऊन दुसरा क्रमांक या मुलीनी पटकावले होते व भारताचे नाव लौकीक केले होते आता जपान च्या दौऱ्यात टीम इंडिया कडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

 निवड झालेल्या मुलीची नावे पुढीलप्रमाणे आहेत १)कोमल गायकवाड (महाराष्ट्र),२) भाग्यश्री रुग्गी (महाराष्ट्र),३) स्वाती माने (महाराष्ट्र)४) निर्मला बेन ठाकरडा (गुजरात) ५) शितल कुमारी (उत्तराखंड) ६) शेफाली रावत (उत्तराखंड) यांच्या समावेश आहे. भारताच्या वतीने  गोलरक्षक म्हणून अर्पणा ई (केरल) श्रध्दा यादव (उत्तराखंड) यांची निवड झाली करण्यात आले आहे या खेळाचे प्रशिक्षक म्हणून सीमा मॅडम हे भारताच्या वतीने काम पाहणार आहे.

Post a Comment

Previous Post Next Post