पिंपरी चिंचवड अग्निशमन दलाचे जवानानी आग आटोक्यात आणली . कुठलीही जीवीत हानी नाही
प्रेस मीडिया लाईव्ह :
चंद्रशेखर पात्रे :
देहूरोड दि. :- विकास नगर किवळे धनश्री होटेल च्यामागे दुर्गादेवी महोत्सव ट्रस्टच्या साहित्याला आग लागुन देखावे साहित्य जळुन खाक झाले.
देखावेचे साहित्य बाहेर ठेवले असता अचानक आग लागले आग लागल्याने स्थानिक नागरिकांनी काही सामाजिक कार्यकर्त्यानी पिंपरी चिंचवडच्या अग्नीशामक दलाला कळविले असता २० ते २५ मिनटात अग्नीशामक दलाची गाडी आग लागल्याचे ठिकाणी दाखल झाले आणी आग आटोक्यात आणली आग कशामुळे लागली हे अद्याप स्पष्ट झालेले नाही आग लागल्याने नागरीकांनी एकच गर्दी केली होती या आगीत जीवीत हानी झालेली नाही पण साहित्य जळुन खुप मोठे नुकसान झाले आहे. कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या वतीने अग्नीशामक दलाची गाडी खुपचं उशीरा आल्याने नागरिकांनी संताप व नाराजगी व्यक्त केले