घोराडेश्वर पायथा (शंकर वाडी) निलकंटेश्वर (पानशेत) आणि बसवेश्वर (नसरापूर) साठी कुठ कुठुन बससेवा जाणुन घ्या.
प्रेस मीडिया लाईव्ह :
चंद्रशेखर पात्रे :
देहूरोड दि. :- महाशिवरात्री निमित्त पीएमपीएमएलच्या वतीने महत्वाच्या बसस्थानकांवरून विशेष बससेवा शिवभक्तांना मिळणार आहे महाशिवरात्रीच्या निमित्ताने २६ फेब्रुवारी २०२५ रोजी पुणे महानगर परिवहन महामंडळ लि. (पीएमपीएमएल) तर्फे भाविकांच्या सोयीसाठी विशेष बससेवेचे नियोजन करण्यात आले आहे.
महाशिवरात्रीच्या निमित्ताने २६ फेब्रुवारी २०२५ रोजी पुणे महानगर परिवहन महामंडळ लि. (पीएमपीएमएल) तर्फे भाविकांच्या सोयीसाठी विशेष बससेवेचे नियोजन करण्यात आले आहे. पुणे शहर तसेच उपनगरातून मोठ्या प्रमाणावर भाविक निळकंठेश्वर (बीएसएफ सेंटर, पानशेत), बनेश्वर (नसरापूर) आणि घोराडेश्वर मंदिर पायथा (शंकरवाडी) येथे लाखोंच्या संख्येने भाविक येत जात असतात भाविक भक्तांना याठिकाणी जाण्यासाठी पीएमपीएमएलकडून नियमित आणि अतिरिक्त बससेवेची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
महत्वाच्या मार्गांवरील बससेवा : - कात्रज सर्पोद्यान ते बनेश्वर (चेलाडी फाटा) – पहिली बस पहाटे ५.३० वा., एकूण ११ बसेस, सरासरी २० मिनिटांनी एक बस.
:- स्वारगेट मुख्य बसस्थानक ते निळकंठेश्वर (बीएसएफ सेंटर, पानशेत) – पहिली बस पहाटे ३.३० वा., एकूण १४ बसेस (१२ जादा बसेस), बस उपलब्धतेचा सरासरी वेळ १० ते १५ मिनिटे. तर
:- निगडी (पवळे चौक) ते घोराडेश्वर मंदिर पायथा (शंकरवाडी) – पहिली बस पहाटे ५.२० वा., एकूण २४ बसेस, बस उपलब्धतेचा सरासरी वेळ १० ते १५ मिनिटे.
याशिवाय, पीएमपीएमएलच्या ६१, २९६, २९६अ, ५२अ, २२८, ३०५, ३४१, ३४२, ३६८ आणि ३७१ या नियमित बसमार्गांवरही वाहतूक सुरू राहणार आहे. पीएमपीएमएल प्रशासनाने भाविकांना या विशेष बससेवेचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे.