छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती धुमधडाक्यात देहूरोड शहरात साजरी


प्रेस मीडिया लाईव्ह :

चंद्रशेखर पात्रे :

देहूरोड  : हिंदवी स्वराज्याचे संस्थापक बहुजन प्रतिपालक महाराष्ट्राचे आराध्यदैवत युगपुरूष श्री छत्रपती शिवाजी महाराज यांची ३९५ वी जयंती शासना नुसार बुधवारी दिनांक १९/२/२०२५ रोजी शिव स्मारक समिती व शिव जयंती महोत्सव समिती देहुरोड शहर यांच्या संयुक्त विद्यमाने धुमधडाक्यात साजरा करण्यात आला.



देहूरोड शहरामधील पंचक्रोशीतील सर्व राजकीय पक्ष, सामाजिक संस्था, विविध संघटना व सार्वजनिक मंडळे, व व्यापारी यांचे प्रमुख पदाधिकारी आणि पत्रकार व शिवप्रेमी यांनी सकाळी ठीक ९, ३० वा श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिषेक व पूजा  जेष्ठ नेते  बाळासाहेब शैलार यांच्या हस्ते करण्यात आले देहूरोड कँन्टोन्मेंट बोर्डाचे माजी अधिक्षक श्रीरंग सावंत यांच्या हस्ते पूजा करण्यात आले तर नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या पुतळ्यास आरपीआयचे (आठवले)जेष्ठ नेते श्रीमंत शिवशरण व राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते गणेश कोळी यांच्या हस्ते पुष्प हार अर्पण करण्यात आला ऐतिहासिक नेताजी सुभाषचंद्र बोस चौकात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास कॅन्टोन्मेंट बोर्डाचे प्रशासक अॅड कैलास पानसरे यांनी पुष्प हार अर्पण केला व श्रीराम यांच्या पुतळ्यास बेटी पढाओ बेटी बचाव चे प्रणेते नारायणी देवी चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष ईश्वर शेठ अगरवाल यांनी पुष्पहार अर्पण केले. प्रथम सकाळी १० वा डॉ बाबासाहेब आंबेडकर रोड दत्त मंदिर येथे रामभाऊ दांगट यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे पूजन केले तर सायंकाळी ६ वाजता देहुरोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विक्रम बनसोडे यांच्या हस्ते  श्रीफळ फोडून मिरवणुकीची सुरवात झाली यावेळी समितीच्या वतीने श्रीफल पुष्प व फेटा बांधून त्यांचे सन्मान करण्यात आले. या मिरवणुकीत खास आकर्षण माता जिजाऊ व बाळ शिवाजीचा वेशभूषा परिधान करून घोड्यावर स्वार असलेले मुख्य आकर्षण देखावा होता तसेच देहूरोड मध्ये पहिल्यांदाच भगवान श्रीराम यांचे भव्य दिव्य मुर्ती व समोर छत्रपती शिवाजी महाराजांच्या ची मुर्ती हे ही देखावा होता.तर मिरवणुकीत सहभागी झालेल्या  महिला पुरूषांनी फेटा बांधून व विविध रंगांच्या कपडे परिधान करून मिरवणुकीची शोभा वाढविले यावेळी महाराजांची भव्य मिरवणूक ढोल ताशा आणी फटाक्यांची आतषबाजी करण्यात आले नेताजी सुभाषचंद्र बोस चौक येथुन या मिरवणुकीला सुरुवात झाली डॉ आंबेडकर रोड मार्ग ,गुरुद्वारा, ते सुभाष चौक, वृंदावन चौक ते जुने मुंबई पुणे हायवे वरून पुन्हा स्वामी विवेकानंद चौक येथे मिरवणुकीची सांगता झाली. 

यंदा शिवस्मारक समिती चे अध्यक्ष सागर लांगे यांची अध्यक्षपदी निवड झाल्यानें सागर लांगे यांनी आलेल्या सर्व पाहुण्यांचे स्वागत करून जेष्ठ लोकांनी मला अध्यक्षपदी निवड केली त्या बद्दल आभार प्रकट केले तर दिनांक २०फेब्रुवारी रोजी महाराष्टार्ची लोकधारा करमणूक कार्यक्रम सायंकाळी ७ते १० डॉ बाबासाहेब आंबेडकर रोड दत्तमंदिर येथे होणार आहे या कार्यक्रमात सर्वानी सहभागी व्हावे असे आवाहन देखील त्यांनी केले या भव्य दिव्य मिरवणुकीत शहरातील सर्व सामाजिक शैक्षणिक राजकीय नेत्यांनी भाग घेतला तर देहुरोड पोलीसांच्या वतीने वरिष्ठ पोलीस निरीक्षक विक्रम बनसोडे यांनी कुठले ही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मोठा पोलीसांचा फौजफाटा तैनात केले होता.



Post a Comment

Previous Post Next Post