रिक्षा प्रवासी वाहतूक सेवा संघटनेच्या वतीने डॉ बाबासाहेब आंबेडकर प्रवेशद्वार समोर शिवजयंती साजरा.

 देहूरोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विक्रम बनसोडे यांनी न घाबरण्याचे दिला सल्ला छेडखानी गुंडगिरी खपवून घेणार नाही, माझ्याशी थेट संपर्क साधा.


प्रेस मीडिया लाईव्ह :

चंद्रशेखर पात्रे :

देहूरोड दि. स्वामी विवेकानंद चौक येथील रिक्षा प्रवासी वाहतूक सेवा संस्था देहुरोड यांच्या वतीने डॉ बाबासाहेब आंबेडकर प्रवेशद्वार समोर छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहपूर्ण साजरा करण्यात आले.


यावेळी कॅन्टोन्मेंट बोर्डाचे मनोनित अधिकारी अॅड कैलास पानसरे यांच्या हस्ते दिप प्रज्वलन करण्यात आले तर देहूरोड चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विक्रम बनसोडे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात झाली या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून देहुरोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विक्रम बनसोडे कॅन्टोन्मेंट बोर्डाचे प्रशासक ॶॅड. कैलास पानसरे मानव आधार सामाजिक संघटनांचे राज्य उपाध्यक्ष बाबु हिरमेठकर हे उपस्थित होते. यावेळी समितीच्या वतीने आलेल्या पाहुण्यांचे श्रीफल गुलाब पुष्प देऊन सन्मान करण्यात आले.

यावेळी देहूरोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विक्रम बनसोडे यांनी आयआयटी क्षेत्रातील विविध शाखेत शिक्षण घेत असलेले वैक्सन बिझनेस पाॅईट चे विद्यार्थ्यांना संबोधित करताना म्हणाले छत्रपती शिवाजी महाराज हे आपले महाराष्ट्राचे आराध्यदैवत आहे १८ पगड जातीला घेऊन त्यांनी स्वराज्याची स्थापना केली असे शूरवीर छत्रपती शिवाजी महाराज यांची ३९५ व्वा जयंती आज आपण सर्व जण साजरा करीत आहे आज मला ही जयंती साजरा करताना अत्यंत आनंद होत आहे आपण ही महाराजांचे आचार विचार घेऊन पुढे चालले पाहिजे असे मनोगत यावेळी व्यक्त केले पुढे म्हणाले आज शाला काॅलेज टु्युशन सारखे ठिकाणी टवाळ खोर पोर मुलींची छेडछाड करताना दिसतात अशेनी आपण न घाबरता आमच्या शी संपर्क साधा तो कोणी ही असो त्याला चांगला धडा शिकविले जाईल या देहूरोड शहरात गुंडगिरी छेडखानी सारखे गोष्ट खपवून घेतले जाणार नाही आपण जीथे जिथे शिक्षण घेत आहेत किंवा रस्त्यावर जात असेल कुणी तुम्हांला छेडले तर मला डायरेक्ट फोन करा असे म्हणुन आपले मोबाईल क्रमांक उपस्थित विद्यार्थ्यांना दिले सर्वांना या गोष्टीचा स्वागत करत टाळ्यांच्या गजरात विक्रम बनसोडे यांचे स्वागत केले यापुर्वी अनेक वरिष्ठ पोलीस निरीक्षक होऊन गेले हे पहिले वरिष्ठ पोलीस निरीक्षक आहेत जनसामान्यांना खुलेआम आपले संपर्क क्रमांक दिले आहे. यावेळी आयआयटी मध्ये शिकत असलेल्या कु. पुजा रासव व अर्जुन जाधव या विद्यार्थ्यांनी ने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर व्याख्यान व त्यांच्या जयंतीनिमित्त छत्रपती शिवाजी महाराजांचे लढाऊ जीवन चरित्र सांगुन सर्वांना मंत्रमुग्ध केले. यावेळी वैक्सन बिझनेस कंपनीचे सुरक्षाव्यवस्था चे सुमेध कदम व प्रथमेश सावंत हे उपस्थित होते. यावेळी मानव आधार सामाजिक संघचे राज्य उपाध्यक्ष बाबु हिरमेठकर यांनी रिक्षा प्रवासी वाहतूक सेवा संस्था रिक्षा संघटनेला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त सुंदर सोनेरी रंगाची छत्रपती शिवाजी महाराज यांची मोठी मुर्ती प्रदान केली यावेळी रिक्षा प्रवासी वाहतूक सेवा संस्था च्या वतीने बाबु हिरमेठकर यांचे शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन संस्थेच्या वतीने सत्कार केले व आभार प्रकट केले यावेळी सर्वाचे आनंद गगनाला भिडले होते व बाबु हिरमेठकर यांचे कौतुक ही करण्यात आले .

या कार्यक्रमाचे अध्यक्ष विजय मालगी तर आयोजक रफिक शेख हे होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रिक्षा प्रवासी वाहतूक सेवा संस्थेचे अध्यक्ष शंकर दोडमणी, सचिव विजय जाधव, उपाध्यक्ष किरण वाल्मिकी, सल्लागार सलीम सय्यद, खजिनदार संतोष ढमाले सभासद तुकाराम बागल, विजय तरस जयानंद गायकवाड,राजा सिंग, प्रदिप सोनार,अय्याज गोलंदाज,गुड्डू भास्कर पांडे असे सर्व आजी माजी पदाधिकारी उपस्थित होते या कार्यक्रमात परशुराम दोडमणी जेष्ठ पत्रकार अशोक कांबळे, प्रेस मीडीया लाईव्ह चे प्रतिनिधी चंद्रशेखर पात्रे, पुणे खबर चे संपादक रजाक शेख, ॶड कृष्णा दाभोळे, प्रमोद भोसले,बाबु दुधघागरे, संजय पिंजण, भरत नायडू, प्रकाश कांबळे, शिवाजी दाभोळे, बिटु लांगे, बाळा झंझाट, गफूरभाई शेख , जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते विलास हिनुकले यांच्या वतीने विद्यार्थ्यांना व सर्व उपस्थितांना वरिष्ठ पोलीस निरीक्षक विक्रम बनसोडे यांच्या हस्ते अल्पोपहार वाटप करण्यात आले. आदि मान्यवर उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post