देहूरोड गहूंजे येथे भारतीय बौद्ध महासभा व समता मित्र मंडळाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी.
प्रेस मीडिया लाईव्ह :
चंद्रशेखर पात्रे :
देहुरोड दि. :- महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची ३९५ वी जयंती देशभरात साजरी होत असताना देहुरोड गहुंजे येथे समता मित्र मंडळाच्या वतीने सद धम्म बुद्ध विहार गहुंजे येथे विविध उपक्रम राबवुन ढोल ताशांच्या गजरात छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहात संपन्न झाले.
गहूंजे गावचे पोलीस पाटील ॶॅड सारिका हिरामण आगळे, विद्यामन उपसरपंच निलेश सुदाम बोडके, सरपंच कुलदीप बोडके, माजी सरपंच उमेश बोडके,तंटामुक्ती अध्यक्ष मनोज बोडके, युवा उद्योजक किरण भरत पिंगट भारतीय बौद्ध महासभा देहूरोड शाखा सरचिटणीस प्रकाश कांबळे व तसेच महिला अध्यक्षा पुष्पा संजय कांबळे व त्यांच्या महिला पदाधिकारी ,ग्रामपंचायत सदस्य हिरामण आगळे व माजी उपसरपंच नितीन बोडके,अतुल बोडके, ग्रामपंचायत सदस्य निता संदीप आगळे, मुळशी तालुक्याचे लोकप्रिय आमदार यांचे पुतणे सौरभ मांडेकर, व उद्योजक विशाल मारणे सह पंचक्रोशीतील ,गहूंजे गावचे ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते,
भारतीय बौद्ध महासभा देहूरोड शाखा शहराध्यक्ष संजय आगळे यांच्या मार्गदर्शनाखाली समता मित्र मंडळाच्या वतीने कार्यक्रम उत्साहात संपन्न करण्यात आला,
यावेळी कार्यक्रमास उपस्थित मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून दिप प्रज्वलन करून पूजन करण्यात आले, सर्व प्रथम
छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर पोवाडे व पाळणा गाऊन भारती पिंगट यांनी सकाळच्या कार्यक्रमांमध्ये भाग घेतला, तदनंतर लहान मुलांच्या विविध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते यात मुलांनी सहभाग घेऊन सर्वांचे लक्ष वेधून घेतले, सायंकाळी सहा वाजता छत्रपती शिवाजी महाराज यांची भव्यदिव्य मिरवणूक काढण्यात आली मिरवणुकी मध्ये सहभागी झालेल्या रमाबाई लेझीम पथक पिंपरी यांचे संयोजक संगीता भंडारे यांच्या मार्गदर्शनाखाली लेझीम पथकाने उत्कृष्ट ढोल ताशांच्या प्रदर्शन केले, व उपस्थित लोकांना मंत्र मुग्ध केले, मिरवणूक झाल्यानंतर राष्ट्रीय प्रबोधनकार स्नेहा गायकवाड यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर व्याख्यान झाले, यावेळी लहान मुलांनी विविध उपक्रमात भाग घेऊन कौतुकास्पद कामगिरी केल्याबद्दल उपस्थित मान्यवरांच्या हस्ते मुलांना वेगवेगळ्या बक्षीस प्रदान केले.
यावेळी गहुंजे गावचे पोलीस पाटील ॶॅड सारिका हिरामण आगळे गावचे विद्यामन उपसरपंच निलेश सुदाम बोडके सरपंच कुलदीप बोडके माजी सरपंच उमेश बोडके तंटामुक्ती अध्यक्ष मनोज बोडके तसेच युवा उद्योजक किरण भरत पिंगट व समता मित्र मंडळाचे सर्व कार्यकर्ते तसेच भारतीय बौद्ध महासभेचे देहूरोड शहराचे अध्यक्ष संजय हरिभाऊ आ मिरवणुकीमध्ये गावातील ग्रामस्थ व समता मित्र मंडळातील सर्व कार्यकर्ते व भारतीय बौद्ध महासभा देहूरोड सर्व कार्यकर्ते महिला पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.