डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळा विटंबना व संविधान जाळल्याचा निषेधार्थ डॉ बाबासाहेब आंबेडकर संघर्ष समिती भारतीय संविधान सन्मान समिती देहुरोड सर्व पक्षियांच्या वतीने जाहीर निषेध व जन आक्रोश मोर्चा.

या पुढे जर परत असे निंदनीय घटना घडली तर भीम अनुयायी गप्प बसणार नाही जसाच तसे उत्तर देऊ.



प्रेस मीडिया लाईव्ह :

चंद्रशेखर पात्रे :

देहूरोड दि. :- पंजाबच्या अमृतसर हेरिटेज स्ट्रीट येथे जात्यांध वादी माथेफिरूने डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची तीस फुटी उंच मूर्ती  समाजकंटक माथे फिरू आकाश दीप नावाच्या  ईसामाने संविधानाची जाळपोळ केली त्यानंतर शीडीवर चढून तीस फूट उंची असलेल्या डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची मूर्ती  हातोड्याने तोडण्याचे प्रयत्न केले याचे पडसाद देशभरात उमटले असता या निंदनीय घटनेच्या निषेधार्थ देहूरोड येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर संघर्ष समिती भारतीय संविधान सन्मान समितीच्या वतीने सर्वपक्षीय नेत्यांनी निषेध व्यक्त करत जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला. डॉ बाबासाहेब जनरल हॉस्पिटल येथुन या मोर्चाची सुरूवात झाली सर्व प्रथम डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास

एम डी चौधरी यांच्या हस्ते पुष्पमाला अर्पण करण्यात आले डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने जयघोषणा देण्यात आलंयावेळी संताप व्यक्त करत यावेळी जमलेले लोकांनी या आकाश दीप माथेफिरू चे कारायचे काय, खाली डोके वर पाय, आकाश दीप या माथेफिरू वर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा, त्यांचावर अट्रोसिटी अक्टचा गुन्हा दाखल करा, या माथेफिरूचे भारतीय नागरिकत्व रद्द करा, त्याची भारतदेशातुन त्याची हकालपट्टी करा असे बैनर हातात घेऊन जोरदार घोषणाबाजीने हा जन आक्रोश मोर्चा मुंबई पुणे महामार्गावरून निघून देहूरोड अंकित पोलीस चौकी उड्डाणपूल येथुन वृंदावन चौक,भाजी मंडई येथून ऐतिहासिक नेताजी सुभाषचंद्र बोस चौक येथे जन आक्रोश मोर्चा चे  आंदोलनात रुपांतर झाले. यावेळी आरपीआयचे (आठवले)जेष्ठ नेते श्रीमंत शिवशरण यांनी २६ जानेवारी रोजी जे घटना घडली हे नींदनीय असुन या आकाश दीप माथेफिरू जात्यांध वादावर अट्रोसिटी अक्टचा गुन्हा दाखल केला पाहिजे त्यांची नागरिकत्व रद्द करून त्याला देशा बाहेर हाकलुन दिले पाहिजे, त्या जात्यांध वादी आकाश दीप ला फाशीची शिक्षा दिली तरी कमीच आहे, आणी पंजाब सरकारचे पाय उतार झाले पाहिजे, त्यांचा निष्काळजीपणा मुळे ही घटना घडली आहे पंजाब सरकार बरखास्त केले पाहिजे, असे मनोगत व्यक्त केले, भारतीय संविधान सन्मान समिती चे अध्यक्ष डॉ रामदास ताटे यांनी निषेध नोंदविताना म्हणाले जेव्हा जेव्हा भारतामध्ये निवडणुका येतात तेव्हा तेव्हा असे घटना घडतात जेव्हापासून हे भाजपचे सरकार आले आहे तेव्हापासून असे घटना वारंवार घडत आहे व देशाची शांतता भंग होत आहे परभणी मध्ये घटना घडली त्या पाठोपाठ परत पंजाब मध्ये आता ही घटना घडली असे घटना वारंवार घडत आहे याच्या मागे कोण सूत्रधार आहे त्याच्या शोध घेतले पाहिजे या अगोदर खैरलांजी ची घटना घडली होती संपुर्ण देशात पडसाद उमटले होते तर देशात काही मनुवादी लोक जातीय दंगल भडकवण्याचा प्रयत्न करत आहेत आणि जातीयदावाद लोकांना माहित आहे जय भीम हे मातेफिरू आहे यांचे भावना दुखावले की हे चिडून जातात व रस्त्यावर उतरून तोडफोड करतात कशे प्रकारे जातीय दंगल घडवले पाहिजे असे त्यांचा विचार आहे, आता ही पद्धत बदलली आहे आम्ही दंगल भांडण तंटे करणार नाही तुम्ही किती अपमान बाबासाहेबांचे व संविधानाचे अपमान करा परंतु बाबासाहेबांचे नावे हे अख्या जगात उंच आहे आणि उंच राहील संविधान अमर आहे, संविधान अमर राहील, कोणी किती प्रयत्न केले तरी संविधान बदलण्याची "कोणाचा माई का लाल" आले तरी संविधान बदलणार नाही कारण बाबासाहेबांनी घटना तशी तरतूद केलेली आहे व तशी लिहिली आहे याचा त्रास या मनुवाद्यांना होत आहे आज आम्ही डॉ बाबासाहेब संघर्ष समिती व भारतीय संविधान सन्मान समितीच्या व सर्व पक्षीय वतीने जाहीर निषेध जन करोश मोर्चा काढले आहे असे मनोगत व्यक्त केले. यावेळी धर्मपाल तंतरपाळे यांनी या देशांमध्ये वारंवार असे घटना घडत आहे ही जी घटना झाली आहे याचा मध्ये मला राजकारणी दिसत आहे षड्यंत्र रचले गेले आहे कारण दिल्लीचे निवडणूक आता तोंडावर आहे पंजाब एक असा राज्य आहे जिथे जातीपाती धर्माला थारा नाही तिथे मानवतावाद आहे यापुढे जर असे बाबासाहेबांचे व संविधानांचे विटंबना केली जाईल तर आम्ही गप्प बसणार नाही या मनवाद्यांना सांगू इच्छितो यापुढे असे संविधानाची विटंबना केली जाईल त्या मनुवाद्याला आम्ही ही जाळल्या शिवाय गप्प बसणार नाही असे संतापजनक प्रतिक्रिया व्यक्त केली.

यावेळी भारतीय बौद्ध महासभा चे शहर अध्यक्ष संजय आगळे यांनी पंजाब मध्ये जे घटना घडली हे नींदनीय असुन ज्या बांडगुळाने हे कृत्य केले आहे त्यांचावर अट्रोसिटी सह राष्ट्रदोहाचा गुन्हा दाखल झाले पाहिजे यापुढे जर अशी कुठलीही नींदनीय घटना घडली तर भिमसैनिक गप्प बसणार नाही जे कोणी असेल त्याला भिमसैनिक धडा शिकविले शिवाय गप्प बसणार नाही असे संताप यावेळी व्यक्त केले. अल्पसंख्याक सेलचे जेष्ठ नेते अब्दुलभाई गफूर शेख म्हणाले ज्याचा संविधानावर हे देश चालत आहे त्या बाबासाहेबांचे विटंबना होणे हे देशाचे अपमान आहे संविधान लिहताना बाबांनी न तलवार उचलली न कुठलेही शस्त्र उचलले फक्त पेन उचलुन संविधान रचले आणी देशाला संविधान दिले असे महामानवाचे विटंबना होणे अत्यंत नींदनीय आहे पुढे आपल्या शैलीत म्हणाले  "बेहकायेगा क्या कोई शैतान, हम दलितोको,हम आग लगा देगे,बर्फीली चट्टा नो मे" अशी जहरी टीका मनुवाद्यांना केली. जेष्ठ नेते भारतीय संविधान सन्मान रॅली समितीचे समन्वयक विजय पवार यांनी ज्यांनी सर्वधर्मसमभाव म्हणून देशाला संविधान दिले ज्यांनी या देशाला एकासुत्रात बांधले ज्याचा घटनेवर देश चालतो ज्या मनुवाद्यांनी विटंबना केली त्याचा निषेध होणे गरजेचे आहे यापुढे जर अशी पुनरावृत्ती झाली तर भीम अनुयायी गप्प बसणार नाही ज्यात्यांधवाद्यांना सडेतोड उत्तर दिले जाईल असे संतापि मनोगत व्यक्त केले यावेळी जोरदार घोषणाबाजी देऊन पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या वतीने देहुरोड देहूरोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विक्रम बनसोडे व पुणे जिल्हा अधिकारी यांच्या वतीने ग्राम अधिकारी रवी मोरुडकर यांना निवेदन देण्यात आले या जन आक्रोश मोर्चा मध्ये मोझेस दास,राहुल गायकवाड, बाबु हिरमेठकर, शंकर तलारी, विजय धावारे, दिपक भालेराव, सुनिल गायकवाड, प्रविण साखरे, प्रकाश कांबळे रुईकर, के एच सुर्यवंशी, उत्तम हिंगे गुरूजी, इरप्पा तेलगु ,बाबु टेक्केल,मलिक शेख,शकुर शेख, प्रकाश साबळे,श्रीयश रोकडे,नरेश कांबळे,राम कांबळे,गौतम गायकवाड, बाबा सलीम टेलर, सलीम करीम शेख, प्रकाश म्हसे, जावेद भाई शेख, चंद्रकांत अनागोंदी, विशाल चव्हाण, संजय शिंदे,बाबु दुधघागरे रित्तू उर्फ कुक्की तर महिला मध्ये सोनी उर्फ रामनानी जाधव,पुष्पा संजय कांबळे,पुष्पा सोनवणे,शोभा वाघमारे आदि उपस्थित होते हे जन आक्रोश मोर्चा यशस्वी करण्यासाठी डॉ बाबासाहेब आंबेडकर संघर्ष समिती व भारतीय संविधान सन्मान समिती चे समन्वयक परशुराम दोडमणी, मोझेस दास,बाबु हिरमेठकर, बाबु टेक्केल, इरप्पा तेलगु ,  दिलीप कडलक , महेश गायकवाड़ आदिनी परिश्रम घेतले तर राहुल गायकवाड यांनी आभार मानले.

Post a Comment

Previous Post Next Post