प्रेस मीडिया लाईव्ह :
विशेष प्रतिनिधी : सुनील पाटील
रायगड जिल्हा पोलादपूर पोलीस स्टेशन अंतर्गत लाच लुचपत प्रतिबंधक अधिकाऱ्यांनी तहसीलदार कपिल तुकाराम घोरपडे यांच्यावर लाच मागणीचा गुन्हा दाखल करण्यात आला
गुन्हा नोंद क्रमांक:- पोलादपूर पोलीस ठाणे गुन्हा नोंद क्रमांक 10/2025, कलम 7 भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम.तक्रारदार:- पुरुष, वय 39 वर्षे आरोपी:-कपिल तुकाराम घोरपडे, वय-39 वर्षे,पद-तहसिलदार, पोलादपूर, जिल्हा रायगड (वर्ग-1)रा.ठि. मंगलमूर्ती कॉम्प्लेक्स, बी विंग, फ्लॅट क्रमांक 408, चौथा मजला, तालुका पोलादपूर, जिल्हा रायगड.
तक्रार प्राप्त:- दि. 03/02/2025
लाच मागणी पडताळणीः- दि.04/02/2025
लाचेची मागणी रक्कमः- ₹ 3,00,000/- व तडजोडी अंती रुपये 2,50,000/-
या बाबत थोडक्यात माहिती :-
यातील तक्रारदार यांना अखत्यारपत्र दिलेल्या इसमाचे मौजे पार्टे कोंड, तालुका पोलादपूर जिल्हा रायगड येथे असलेल्या जमिनीच्या तफावती बाबत दावा दाखल केला होता.
सदर दाव्याचा निर्णय देऊन आदेशाची प्रत देण्याकरिता दि. 31/01/2025 रोजी तक्रारदार यांचेकडे आरोपी लोकसेवक श्री कपिल तुकाराम घोरपडे, तहसीलदार पोलादपूर यांनी 3,00,000/-रु. लाचेच्या रकमेची मागणी केल्याची तक्रार दि. 03/02/2025 रोजी प्राप्त झाली होती.
तक्रारीच्या अनुषंगाने दि. 04/02/2025 रोजी करण्यात आलेल्या पडताळणी दरम्यान आरोपी लोकसेवक श्री कपिल तुकाराम घोरपडे तहसीलदार पोलादपूर यांनी तक्रारदार यांचेकडे जमिनीची तफावत बाबत दाखल केलेल्या दाव्याच्या आदेशाकरिता रक्कम रुपये 3,00,000/- लाचेच्या रकमेची मागणी करून तडजोडी अंती रक्कम रुपये 2,50,000/- मागणी केल्याचे निष्पन्न झाले. तसेच दिनांक दि.05/02/2025 रोजी व दिनांक 18/02/2025 रोजी आरोपी लोकसेवक श्री कपिल घोरपडे यांच्याविरुद्ध सापळा आयोजित करण्यात आला होता. परंतु त्यांना संशय आल्याने त्यांनी लाचेची रक्कम स्वीकारली नाही. सबब आरोपी लोकसेवक कपिल घोरपडे तहसीलदार पोलादपूर यांच्याविरुद्ध लाच मागणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
▶️ सापळा अधिकारी - शशीकांत पाडावे, पोलीस उप अधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, रायगड अलिबाग
▶️ पथक -
1) शशीकांत पाडावे पोलीस उप अधीक्षक
2) निशांत धनवडे
पोलीस निरीक्षक
3) संतोष भिसे,
पोलीस निरीक्षक
4) स. फौ. विनोद जाधव
5) स. फौ. अरुण करकरे
6) पोहवा/2180 महेश पाटील
7) पोहवा/ 2271 सचिन आटपाडकर
8) चापोहवा/ 1321 सागर पाटील
▶️ *मार्गदर्शन अधिकारी*-
1. मा. श्री. शिवराज पाटील, पोलीस अधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, ठाणे परिक्षेत्र, ठाणे.
2. मा. श्री. संजय गोवीलकर, अपर पोलीस अधीक्षक, प्रतिबंधक विभाग, ठाणे परिक्षेत्र, ठाणे.
3. मा. श्री. सुहास
शिंदे, अपर
पोलीस अधीक्षक
लाच लुचपत
प्रतिबंधक
विभाग, ठाणे
परिक्षेत्र, ठाणे.
(शशिकांत पाडावे)
पोलीस उप अधीक्षक,
लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, रायगड अलिबाग.
मोबाईल क्रमांक 9870332291