खोटी नियुक्ती पत्रे प्रकरणी राधानगरी तालुक्यातील दोघांना अटक.

 


प्रेस मीडिया लाईव्ह :

मुरलीधर कांबळे :


कोल्हापूर- सीपीआर रुग्णालयात नोकरी लावण्याच्या  आमिषाने मा.जिल्हाधिकारी यांच्या आणि मा.आधिष्ठाता यांच्या नावाचा  बनावट सही शिक्का वापरून खोटी नियुक्तपत्रे देऊन  दोघांची फसवणूक केल्या प्रकरणी नितीन अशोक कांबळे (वय 37. रा.क.वाळवा ,ता.राधानगरी) व नागेश एकनाथ कांबळे (वय 33. रा.शेळेवाडी ,ता.राधानगरी) यांना लक्ष्मीपुरी पोलिसांनी अटक करून त्यांच्यावर फसवणूकीचा गुन्हा दाखल केला.पोलिसांनी या दोघांना आज न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

राधानगरी तालुक्यातील नागेश  कांबळे आणि नितीन  कांबळे यांनी संगनमत करून गायत्री जयवंत वारके आणि दिलीप गणपती दावणे यांचा विश्वास संपादन करून कोल्हापूर येथे सीपीआर रुग्णालयात क्लर्क आणि शिपाई म्हणून नोकरी लावतो असे आमिष दाखवून त्यांच्या कडुन वेळोवेळी पैसे घेऊन त्यांची फसवणूक करण्याच्या उद्देशाने त्यांना आयुक्त मा.जिल्हा विभाग रुग्णालय ,कोल्हापूर.यांना शिफारस केल्याचे नियुक्तपत्र तयार करून त्याच्यावर सीपीआरचे आधिष्ठाता मा.डॉ.एस.एस.मोरे आणि कोल्हापूरचे जिल्हाधिरी मा.अमोल येडगे यांचा बनावट सही आणि शिक्का असलेले नियुक्तपत्र देऊन फसवणूक केल्या प्रकरणी सीपीआर रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ.गिरीश कांबळे यांनी लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती.दिलेल्या फिर्यादी नुसार कांबळे यांच्यावर लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

Post a Comment

Previous Post Next Post