मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पोलीस आयुक्ताल्याचे भूमी पुजन.

 उद्योजकांना त्रास देण्याचा काम कुणी करू नये ते कोणीही पक्षाचे असो मकोकाखाली गुन्हा दाखल करा :- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 


उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा भोसरीच्या दादांचे घेतले कानपिचक्या " ज्यांनी चांगले काम केले त्याला चांगले म्हणण्याचे शिका, तर शिट्ट्या वाजविणऱ्यांना दिला सज्जड दम.

 प्रेस मीडिया लाईव्ह :

चंद्रशेखर पात्रे :

भोसरी :- चिखली जाधव वाडी येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पोलीस आयुक्ताल्याचे भव्य दिव्य भूमी पुजन करण्यात आले महाराष्ट्र राज्याचे तंत्रज्ञान व मॅन्युफॅक्चरिंगची राजधानी म्हणून या पुणे जिल्ह्याची ओळख आहे;  उद्योगधंद्ये वाढीच्यादृष्टीने जागतिक पातळीवर संवाद साधण्यात येत असून त्यामाध्यमातून मोठ्या प्रमाणात गुंतवणूक होत आहे. त्यामुळे पिंपरी चिंचवड शहरातील औद्योगिकीकरण लक्षात घेता उद्योगास पोषक वातावरण निर्मिती करीता पोलीस दलाने काम करावे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भोसरी येथे भूमी पुजन उद्घाटन करतांना केले.



चिखली येथील पिंपरी-चिंचवड आयुक्तालय व पुणे पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या नवीन इमारतीचे भूमिपूजन तसेच पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या विविध विकास कामांचे लोकार्पणप्रसंगी ते बोलत होते. 

फडणवीस म्हणाले, मुंबईनंतर पुणे शहराचे पोलीस आयुक्तालय मोठे होते. पुणे शहराचा विस्तार तसेच जिल्ह्याच्या ग्रामीण भागात मोठ्याप्रमाणात झालेले नागरीकरण तसेच पिंपरी चिंचवड शहरातील मोठ्या प्रमाणातील औद्योगिकीकरण आणि परिसरातील गुन्हेगारी नियंत्रित ठेवणे याबाबींचा विचार करुन सन २०१८ मध्ये पिंपरी-चिंचवड आयुक्तालयाची स्थापना करण्यात आली. यावर्षी नवीन पोलीस आयुक्तालय स्वतःच्या इमारतीत जाणार असून त्याचे आज  भूमिपूजन करण्यात आले आहे.मुख्यमंत्री म्हणाले, शासकीय इमारती चांगल्या झाल्या पाहिजे असा राज्य सरकारचा आग्रह आहे. यादृष्टीने देशातील सर्वात आधुनिक पोलीस आयुक्तालय पिंपरी चिंचवड शहरात होत आहे. त्याच प्रमाणे पोलीस अधीक्षक कार्यालयाची इमारतही होत आहे. याकामी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सहकार्याने अतिशय सुंदर इमारत या ठिकाणी होत आहे. पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांकरिता अत्यंत चांगली निवासस्थाने बांधण्यात आली आहेत. या इमारती बघितल्यानंतर एखाद्या खासगी विकासकाला मागे टाकतील, अशा आहेत. उद्योगधंद्याला राज्यात त्रास होता कामा नये त्रास देणारे ते कुठलेही पक्षाचे असो आमचे युतीतील असले तरी मागे पुढे बघु नका मोकाका खाली कारवाई करा आम्ही तुमच्या पाठीशी आहे 

सामाजिक उत्तरदायित्व निधीतून म्हाळुंगे औद्योगिक पोलीस संकुल बांधण्यात आले आहे. याचा मनस्वी आनंद आहे, असे सांगून ते म्हणाले, उद्योग क्षेत्राच्या वाढीसाठी राज्य शासन प्रयत्न करत असताना उद्योगधंद्याला राज्यात त्रास होता कामा नये. असे यावेळी फडणवीस म्हणाले 


यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, या कार्यक्रमाच्या माध्यमातून सुमारे ७३० कोटी रुपयांचे विविध विकासकामे होणार आहे. यामध्ये पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे ४७५ कोटी आणि पिंपरी चिंचवड शहर पोलीस आयुक्तालयाचे १८० कोटी रुपये आणि पोलीस अधीक्षक कार्यालय इमारतीचे ६२ कोटी रुपयांची विविध विकासकामे करण्यात येत आहे. ही कामे दर्जेदार, आकर्षक व्हावीत याकरिता संकल्पना स्पर्धा घेण्यात येतात, यामधून उत्तम आराखड्याची निवड करण्यात येते. अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या कार्यप्रणालीत वाढ होण्यासोबतच त्या इमारतीत नागरिकांना समाधान वाटले पाहिजे, यादृष्टीने आगामी ५० वर्षाचा विचार करुन अद्ययावत , इको फ्रेडली इमारतीचे कामे करण्यात येत आहे. 

अजित पवारांनी पुणे पोलिसांना सुनावलं, म्हणाले - "कोण छोट्या आणि मोठ्या बापाचा नाही, 

 भूमीपूजनाप्रसंगी बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुणे पोलिसांना चांगलंच फैलावर घेतल्याचं पाहायला मिळालं. पुण्यामध्ये वाहन तोडफोडीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. कोयता गँग सक्रिय आहे. अशा आरोपींना मकोका लावा. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न का निर्माण होतो, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. तसेच शहरातील गुन्हेगारी बाबत भाष्य करत त्यांनी अधिकाऱ्यांना सुनावलं आहे.

अजित पवार म्हणाले, " बिबवेवाडीत काही वाहने फोडली. यामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. अशा आरोपींना मकोका लावा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर सांगतो आहे. का कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो आहे. आरोपींची धिंड काढा. कोण छोट्या आणि कोण मोठ्या बापाचा नाही. इथं पुणे सिपी पाहिजे होते. त्यांनाही मी ऐकवलं असतं ", असे अजित पवार यांनी म्हंटले आहे. यावेळी महेश लांडगे यांचे चांगले कानपिचक्या घेत महेश लांडगे यांना इशारा करत म्हणाले जरा चांगले कामांचे कौतुक करायचे शिका १९९७ ते २०१७ या काळात मी असताना पिंपरी चिंचवड शहराचे कायापालट मी असताना झाले आहे माझे नाव घेण्यास इतका का कंजूसीपणा करता आता तर युती मध्ये एकत्रित काम करीत आहेत मग माझ्या नावाची इतकी एलर्जी का आहे असे महेश लांडगे यांना अजित पवार यांनी टोळा लावल. पोलीस आयुक्तालयाचे भूमी पुजन कार्यक्रम सुरू असताना काही उपस्थित लोकांनी शिट्ट्या वाजवित होते तेव्हा अजित पवार यांनी शिट्ट्या वाजविणऱ्यांना चांगले सज्जड दम दिला हा कार्यक्रम पोलीसांचा आहे जर शिट्ट्या बंद नाही केले तर पोलीसांना सांगुन उचलायला लाविन असे म्हणताच शिट्ट्या झाले बंद  उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शहरात विविध शासकीय इमारतीचे बांधकाम सुरु.

पुणे शहरात ८७ कोटी रुपये खर्च करुन सारथीची इमारत पूर्ण करण्यात आली आहे. शिक्षण, कृषी, नोंदणी, कामगार, सहकार आणि पणन भवन, जमाबंदी आयुक्तालय, पुणे शहर पोलीस आयुक्तालय, सामाजिक आयुक्तालय, सारथी प्रादेशिक कार्यालय, येरवडा येथे न्यायालय, मनोरुग्णालय, नवीन मध्यवर्ती इमारत, बालेवाडी येथे ऑलम्पिक भवन तसेच पिंपरी-चिंचवड महानगरपालिका इमारत, न्यायालय, आदी इमारतीचे काम करण्यात येत  आहे. इमारतीचे कामे करताना  जागेचा पुरेपूर वापर करुन जागा सपाटीकरण करुन वाहनतळ, स्वच्छ सूर्यप्रकाश, सौर ऊर्जा आदी सुविधा विचारात घेऊन दर्जेदार, टिकाऊ, हरित इमारतीचे बांधकाम करण्यात येत आहे. पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरात लोकसंख्या वाढ होत आहेत, नागरिकांना पायाभूत सर्व प्रकारच्या पायाभूत सुविधा मिळाल्या पाहिजेत, यादृष्टीने काम करण्यात येत आहे. 

कायद्याचे उल्लघंन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी..

पुणे व पिंपरी चिंचवड शहर आणि पुणे जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था सुस्थितीत राहण्याकरीता पोलीस दलाला सर्व प्रकारच्या पायाभूत सुविधा उपलब्ध करुन देण्यात येत आहे. पोलीस दलाने कायदा व सुव्यवस्था सुस्थितीत ठेवावी. कायद्याचे उल्लघंन करणाऱ्यावर कठोर कारवाई करुन गुन्हेगाराला शिक्षा केली पाहिजे, नागरिकांनी कायद्याचे पालन करावे. ताथवडे येथे पिंपरी-चिंचवड शहर पोलीस आयुक्तालयाला २० हेक्टर जागा पुरेशी असून उर्वरित जवळपास  ४५ हेक्टर जागा आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेला नागरी सुविधांकरीता द्यावी, अशी मागणी देण्याबाबत मुख्यमंत्री यांच्याकडे केली.

विकासाला गती देण्याकरीता पुरदंर विमानतळ आवश्यक..

विमानतळामुळे जिल्ह्याच्या विकासाला मर्यादा येत असून विकासाला गती देण्याकरिता पुरंदर विमानतळ करणे आवश्यक आहे. याकरीता भूसंपादनामध्ये जाणाऱ्या जमिनीला राज्यसरकारच्यावतीने योग्य तो मोबदला देण्यात येईल, याकामी नागरिकांनी सहकार्य करावे. पुणे व पिंपरी-चिंचवड शहरातील वाहतुक कोंडी सोडवण्यासाठी रस्ते, पूल बांधण्यासोबतच रिंगरोड, मेट्रो, पीएमपीएमपीएल सेवा सक्षम करण्यावर भर देण्यात येत आहे. सार्वजनिक विकास कामे करताना अतिक्रमणे काढण्यात यावी, असेही श्री. पवार म्हणाले.

यावेळी आमदार श्री. लांडगे म्हणाले, पिंपरी-चिंचवड शहर आयुक्तालयाच्या माध्यमातून गुन्हेगारी नियंत्रण, विविध लोककल्याणकारी योजना व उपक्रम राबविण्यात आलेले आहे. शहराचे नावलौकिक वाढविण्यासोबतच वैभवात भर पाडणारी इमारत उभी राहणार आहे. आगामी पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्यावतीने नागरिकांच्या हिताचे निर्णय घेतील, अशी अपेक्षा श्री. लांडगे व्यक्त केली. 

पिंपरी-चिंचवड शहरात विविध विकास कामे आणि प्रकल्पांचे ई-भूमिपूजन व लोकार्पण..

मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या हस्ते पोलीस आयुक्त कार्यालय, पिंपरी चिंचवड, म्हाळुंगे औद्योगिक पोलीस संकुल व पोलीस विश्रामगृह देहुरोड, पुणे पोलीस अधीक्षक या इमारतींचा भुमीपूजन तसेच प्रेमलोक पार्क, चिंचवड येथील पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त कार्यालय मधील शिवनेरी सभागृहाचे उद्घाटन  करण्यात आले. पिंपरी येथील भूखंडावरील मध्यवर्ती अग्निशामक केंद्र आणि अग्निशामक प्रबोधिनी इमारत,  आकुर्डी प्राधिकरण येथील हेडगेवार भवनजवळील अग्निशमन केंद्र, पवना नदीवरील मामुर्डी ते सांगवडे दरम्यान जोडणाऱ्या पुलाच्या कामाचे भूमीपूजन तसेच मधुबन हॉटेल ते इंदिरा रोड, २४ मी. डी.पी रस्ता, सिल्व्हर स्पून हॉटेल ते इंदिरा रोड १८ मीटर डी.पी रस्ता तसेच या दोन्ही रस्त्यांना जोडणाऱ्या वाकड शिवेपर्यंतचा १८ मीटर रुंदीच्या रस्त्याचे कॉक्रीटीकरण करण्याच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला.  

स्मार्ट सिटीच्या वतीने जीआयएस आधारित ईआरपीअंतर्गत कोअर ॲप्लिकेशन (सॅप). नॉन कोअर ॲप्लिकेशन, ई-ऑफिस (डीएमएस) आणि भौगोलिक माहिती प्रणालीमध्ये विकसित केलेल्या संगणक प्रणाली, तालेरा रुग्णालय नवीन इमारत, शहरातील विविध ठिकाणी ‘वेस्ट टू वंडर’टाकाऊ वस्तूंपासून निर्मित केलेल्या टिकाऊ कलाकृती, महापालिकेच्या विविध प्रशासकीय इमारतीवर बसविण्यात आलेल्या रुफ टॉप सोलर प्रणालीचे लोकार्पण तसेच सिटी हब फॉर डेटा अँड कम्युनिकेशन उपक्रम आणि कृत्रिम बुद्धिमत्तेद्वारे स्वयंचलित होर्डिंग शोध व सर्वेक्षण प्रणाली उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला.

पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्यावतीने मुलांना गुन्हेगारी वृत्तीपासून दूर ठेवण्यासाठी दिशा उपक्रमाअंतर्गत घेण्यात आलेल्या फुटबॉल स्पर्धेतील विजेत्यांचा सन्मान करण्यात आले. सायबर गुन्हेगाराचा तपास करणाऱ्या तसेच दहशतवाद विरोधी पथकातील उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्यात आला.

शेखर सिंह यांनी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेअंतर्गत करण्यात येणारी विविध विकासकामे आणि प्रकल्पाबाबत माहिती दिली. तर श्री. चोबे आणि श्री.देशमुख यांनी नवीन इमारतीबाबत प्रास्तविकात माहिती दिली. यावेळी जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, गृहराज्यमंत्री योगेश कदम, आमदार अमित गोरखे, विजय शिवतारे, महेश लांडगे, अण्णा बनसोडे, शरद सोनवणे, शंकर जगताप, बाबाजी काळे, बापूसाहेब पठारे, ज्ञानेश्वर कटके, विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे महानगर आयुक्त योगेश म्हसे, पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त शेखर सिंह, पिंपरी-चिंचवड शहराचे पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, पीएमपीएल व्यवस्थापकीय संचालक दीपा मुधोळ-मुंडे, जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी, जिल्हा पोलीस अधीक्षक पंकज देशमुख,पोलीस सह आयुक्त शशिकांत महावरकर आदी उपस्थित होते.  उपस्थित मान्यवरांचे आभार अपर पोलीस आयुक्त वसंत परदेशी यांनी मानले.

Post a Comment

Previous Post Next Post