KSB चौकातील राजश्री शाहू महाराजांचा पुतळा कचऱ्याच्या विळख्यात , मनपाची दुर्लक्ष

 



प्रेस मीडिया लाईव्ह :

अमर धांडे   : प्रतिनिधी

 भोसरी : KSB चौकातील राजश्री शाहू महाराजांचा पुतळा कचऱ्याच्या विळख्यात सापडला आहे , साफसफाई तर  नाहीच शिवाय  पुतळ्याच्या मागच्या बाजूला  संध्याकाळी काही बेवडे येऊन तिथं दारू पितात आणि रिकाम्या बाटल्या तिथं फेकून देतात व निघून जातात ,  हा सर्व प्रकार  पाहून  वंचित बहुजन माथाडी ने मागच्या आठवड्यात पिंपरी चिंचवड आयुक्ताला निवेदन सादर केलं होत .

 निवेदन देऊन आज परत 8 दिवसानंतर  वंचित चे कार्यकर्ते तिथं अभिवादन साठी गेले असता तिथं कुठल्याही प्रकारची साफ सफाई आढलून आली नाही पुतळा पण तसाच धूळ खात पडलेला आहे आज फुले शाहू आंबेडकरांच्या महाराष्ट्रात दिवसेंदिवस किती महापुरुषांचा अपमान होत आहे आणि महानगरपालिका आयुक्त शेखर सिंह  यांना सांगून सुद्धा त्याकडे कोणी लक्ष देत नाही यापेक्षा किती दुर्दैवी गोष्ट आहे तरी यावर लवकरात लवकर उपाययोजना करण्यात यावी नाहीतर वंचित चे आंदोलन आता लवकरच चालू होईल आणि  काही दुर्दैवी घटना घडण्यास याला सरकार जबाबदार असेल असे वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियन पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष मा.संजय ठोंबे साहेब यांनी आव्हान केले आहे

Post a Comment

Previous Post Next Post