बेडकिहाळ येथील साहित्य संस्कृती आणि शेती सोशल फाउंडेशन यांच्या वतीने महिलांसाठी प्रबोधनपर कार्यक्रम

 


प्रेस मीडिया लाईव्ह :

डॉ. विक्रम शिंगाडे :

बेडकिहाळ येथील साहित्य संस्कृती आणि शेती सोशल फाउंडेशन यांच्या वतीने महिलांसाठी प्रबोधनपर कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाची सुरुवात रोपट्यास पाणी घालून करन्यात आले. मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले. स्वागत डी एन दाभाडे यांनी केले. ही फाऊंडेशन अनेक वर्षांपासून सामाजिक शैक्षणिक क्षेत्रांमध्ये कार्य करीत असुन या फाउंडेशन मध्ये ६० पासून ते ८५ वयोगटातील ज्येष्ठांनी केलेल्या कार्य खरोखरच प्रेरणादायी आहे. फाउंडेशनच्या माध्यमातून साहित्य संस्कृती आणि शेती सोशियल फाउंडेशन प्रामाणिकपणे कार्यरत आहे. युवकांनी यांच्या कार्याचा आदर्श जोपासावा, असे प्रतिपादन माजी जिल्हा पंचायत सदस्य राजेंद्र पवार-वड्डर यांनी मार्गदर्शन करताना म्हणाले.

बेडकिहाळ येथील साहित्य संस्कृती आणि शेती सोशियल फाउंडेशनच्या नूतन कार्यालयाचे उद्घाटन व महिलांना मार्गदर्शन कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी फाउंडेशनचे संस्थापक, अध्यक्ष प्रकाश पाटील किणीकर होते. प्रमुख पाहुणे म्हणून उद्योजिका विद्या शिंदे, जयकुमार खोत, ग्रा. पं. अध्यक्ष शिवानंद बिजले हे होते. 

यावेळी प्रणव मोरे, डॉ. विक्रम शिंगाडे व प्रमोदकुमार पाटील यांचा सत्कार करण्यात आला. कृषी पंडित सुरेश देसाई, बाबासाहेब खोत, चंद्रकांत मोरे यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी विद्या शिंदे म्हणाल्या, महिलांनी एकत्र येऊन व्यवसाय केला पाहिजे. वेळ वाया न घालवता स्वबळावर मनावर घेऊन कार्य केले पाहिजे असे त्या म्हणाल्या. कार्यक्रमास सुनील नारे, मलगौंडा पाटील,व्ही.जे.वडेर, बाबुराव नारे, ॲड. ब्रिजेश शास्त्री, कस्तुरी शास्त्री, तकदीर जमादार, रामचंद्र पुजारी, वसंत केरुमाळी, इलाईदादा केहरे, अभय खोत, बाळासाहेब कोटबागी, राजेंद्र पाटील, प्रधान कुंभार,परगौडा मगदुम, शिवराज चौगुले, शब्बीर अपराज, यांच्यासह बेडकिहाळ, नेज येथील १२ स्वसाहाय महिला संघाच्या शेकडो महिला, फाउंडेशन चे सर्व सदस्य पदाधिकारी, मोठ्या संख्येने उपस्थित होते. श्रीदेवी चौगुले, दुर्गनवर, दिपीका पाटील,हेमा बिजले, यांचे मोलाचे सहकार्य लाभले. सूत्रसंचालन अश्विनी चौगुले यांनी केले. आभार प्रमोदकुमार पाटील यांनी मानले.

Post a Comment

Previous Post Next Post