प्रेस मीडिया लाईव्ह :
अतिग्रे प्रतिनिधी : भरत शिंदे
अतिग्रे तालुका हातकणंगले महाराष्ट्र शासनाच्या वतीने घेण्यात आलेल्या इलेमेंटरी ग्रेड ड्रॉईंग परीक्षेचा पायोनियर हायस्कूल चा निकाल शंभर टक्के लागला यामध्ये एकूण 10 विद्यार्थी होते ते सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झाले त्यापैकी नऊ विद्यार्थी हे सी ग्रेड घेऊन उत्तीर्ण झाले आणि विशेष करून सृष्टी भरत शिंदे या विद्यार्थिनी ने बी ग्रेड घेऊन यश प्राप्त केले तिचे कौतुक सर्व संस्थेचे चेअरमन मुख्याध्यापक व सर्व शिक्षक यांच्यामार्फत हायस्कूलमध्ये करण्यात आले,
या परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेले विद्यार्थी अर्पिता खोत, पार्थ पाटील, प्रज्ञा खोत, प्रणव धनवडे, समृद्धी कुंभार, सारंग कोठावळे, शशिकला खोत, सृष्टी शिंदे, या सर्व उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना शिक्षण संस्था चेअरमन माजी आमदार राजीव जी आवळे साहेब, मुख्याध्यापिका सौ स्मिता राजीव जावळे, यांचे प्रोत्साहन व कलाशिक्षक श्री अशोक भोसले यांचे मार्गदर्शन लाभले