संजय घोडावत इन्स्टिट्यूट मध्ये पालक मेळावा उत्साहात संपन्न

 


प्रेस मीडिया लाईव्ह :

अतिग्रे प्रतिनिधी : भरत शिंदे 

अतिग्रे ता: हातकणंगले येथे सुशीला दानचंद घोडावत चॅरिटेबल ट्रस्ट, संजय घोडावत इन्स्टिट्यूट, अतिग्रे येथे डिप्लोमा इंजिनिअरिंगमध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थांच्या पालकांचा मेळावा मोठ्या  उत्सवामध्ये संपन्न झाला आहे. या कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन करून करण्यात आले. यावेळी संजय घोडावत इन्स्टिट्यूटचे संचालक डॉ. विराट व्ही. गिरी, पालक मेळावा कार्यक्रम समन्वयक, प्रा. पी. एम. पाटील, सर्व विभागाचे विभाग प्रमुख प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, गुणवंत विद्यार्थी व पालक उपस्थित  होते.

   या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. पी. एम. पाटील यांनी केले. विद्यार्थ्यांनी हिवाळी परीक्षा २०२४ मध्ये संपादन केलेल्या गुणांची माहिती  देऊन पालक मेळावा या कार्यक्रमाची रूपरेषा स्पष्ट केली.

कार्यक्रमाचे अध्यक्ष इन्स्टिट्यूटचे संचालक, डॉ. विराट व्ही. गिरी यांनी उपस्थित पालकांना मार्गदर्शन करताना पालक आणि इन्स्टिट्यूटमध्ये असणाऱ्या महत्त्वाच्या बाबी विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी महत्त्वाच्या आहेत. शासनाच्या नियमानुसार होणाऱ्या बदलांचा आढावा अभ्यास मार्गदर्शनाच्या पद्धती विद्यार्थ्यांचे नवीन विषयाकडे पाहण्याचा दृष्टिकोन याविषयी मार्गदर्शन करून पालक मेळाव्यास मोठ्या संख्येने पालक उपस्थित राहिल्याबद्दल सर्व  आभार व्यक्त केले.

या कार्यक्रमात काही पालकांनी आपले मनोगत व्यक्त केले. इन्स्टिट्यूटमध्ये असणाऱ्या भौतिक सुविधा त्याच प्रमाणे आपला पाल्य दैनंदिन उपस्थित आहे किंवा नाही याची वेळोवेळी मेसेजद्वारे मिळणारी माहिती परीक्षेविषयी मिळणारी माहिती ग्रुपच्या साह्यातून मिळणारी माहिती यातून पालकांना आपल्या पाल्यांची प्रगती कशी आहे. याचे  पुरेपूर ज्ञान या इन्स्टिट्यूट मध्ये तात्काळ पालकांना मिळते त्यामुळे आपल्या पाल्यांना पालकाची महत्त्वाची भूमिका बजावता येते. इन्स्टिट्यूट विषयी पालकाने गौरवोद्गार काढून सर्व शिक्षक व यंत्रणेचे आभार व्यक्त केले.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन  प्रा. रणजित शिरोडकर आणि आभार प्राध्यापक रवींद्र धोंगडी यांनी केले.

संजय घोडावत विद्यापीठाचे अध्यक्ष  संजयजी घोडावत आणि विश्वस्त  विनायक भोसले त्यांच्या मार्गदर्शनाखाली पालक मेळावा कार्यक्रम पार पडला आहे.

Post a Comment

Previous Post Next Post