प्रेस मीडिया लाईव्ह :
अतिग्रे प्रतिनिधी :भरत शिंदे
हातकणंगले : डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्रच्या कोल्हापूर जिल्हा शाखेच्या वतीने नवसंकेत न्यूज चॅनेलचे संपादक, संभाजी चौगुले यांची हातकणंगले तालुका सचिवपदी निवड करण्यात आली आहे. संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजा माने यांच्या सूचनेनुसार व जिल्हाध्यक्ष भाऊसाहेब फास्के यांच्या हस्ते ही निवड जाहीर करण्यात आली.
डिजिटल मीडिया क्षेत्रातील पत्रकारांचे हक्क व हित जोपासण्यासाठी आणि माध्यम क्षेत्रात सामाजिक मूल्ये व जबाबदारी दृढ करण्यासाठी चौगुले कार्यरत राहणार आहेत. संघटनेच्या ध्येय-धोरणांनुसार काम करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. जिल्हा संघटक अनिल उपाध्ये, तालुका संपर्कप्रमुख विनोद शिंगे यांनी पत्रकारांच्या प्रश्नांचा उहापोह करतानाच डिजिटल मीडियातील पत्रकारांनी संघटित होण्याची गरज विषद केली. जिल्हा सचिव संजय सुतार, रसूल जमादार यांनी संघटनेच्या वाटचालीचा आढावा घेतला. इचलकरंजी शहराध्यक्ष सलीम संजापुरे यांनीही मनोगत व्यक्त केले.
स्वागत व प्रास्ताविक तालुकाध्यक्ष कीर्तिराज जाधव यांनी केले तर उपाध्यक्ष राजू म्हेत्रे यांनी आभार मानले. बैठकीस इचलकरंजी शहर उपाध्यक्ष विजय तोडकर, रामनाथ डेंगळे, रणधीर नवनाळे, बबन शिंदे, शहाहुसेन मुल्ला, निहाल ढालाईत, सुहास मुरतूले, मुबारक शेख, भरत शिंदे, किशोर जासूद, सचिन लोंढे, समीर पेंढारी, ओंकार बडवे, आप्पासाहेब भोसले यांच्यासह पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.