"सातवे परिसरातील श्रद्धास्थान आळोबानाथ मूर्ती प्रतिष्ठापनेच्या वर्धापन दिन सोहळ्यात कु. पार्थ सुनील पाटील यांचा सन्मान"

 "

प्रेस मीडिया लाईव्ह :

अतिग्रे प्रतिनिधी : भरत शिंदे 

पन्हाळा तालुक्यातील मौजे सातवे येथे सर्व भाविक भक्तांचे श्रद्धास्थान श्री. आळोबानाथ मूर्ती प्रतिष्ठापनेच्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून तर सर्व भाविक भक्तांच्या व ग्रामस्थांच्या सहकार्याने मौजे सातवे या ठिकाणी श्री .ज्ञानेश्वरी व संत तुकाराम गाथा सामुदायिक पारायण सोहळ्याचे आयोजन केले होते. या ठिकाणी नामवंत कीर्तनकार व प्रवचनकार यांना आमंत्रित करून या भागातील लोकांना मोठी पर्वणीच निर्माण केली होती. या कीर्तन व प्रवचनाने भाविक भक्तांना मंत्रमुग्ध केले होते या कार्यक्रमाला आसपासच्या असंख्य खेड्यापाड्यातून भाविक भक्त दररोज उत्स्फूर्तपणे हजेरी लावून कार्यक्रमाचा अलभ्य लाभ घेत असल्याचे जाणवले. या ठिकाणी दररोज नित्यनेमाने धार्मिक विधी शास्त्रोक्त पद्धतीने पार पडले. या कार्यक्रमाच्या निमित्ताने भव्य दिव्य दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या दिंडी सोहळ्याच्या समारोपप्रसंगी सातवे व परिसरातील सतत शैक्षणिक, धार्मिक त्याचप्रमाणे सामाजिक कार्याची प्रसिद्धी देऊन आपल्या तीक्ष्णलेकणीतून समाज जागृती करीत असलेले लोकप्रिय संपादक श्री सुनील पाटील यांचे एकुलते एक चिरंजीव पार्थ सुनील पाटील यांनी नुकत्याच झालेल्या जेई मेन्स परीक्षेत९९:७८ मार्क्स मिळवत घवघवीत यश संपादन केल्याबद्दल त्याचा कीर्तनकार व प्रवचनकार आणि भाविक भक्तांच्या वतीने सन्मान करण्यात आला. या धार्मिक कार्यक्रमांमध्ये सर्व भाविक भक्तांचे ग्रामस्थांचे मोलाचे सहकार्य लाभल्याचे सांगितले जाते.

Post a Comment

Previous Post Next Post