विद्या मंदिर अतिग्रे येथे वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न

 



प्रेस मीडिया लाईव्ह :

अतिग्रे प्रतिनिधी : भरत शिंदे

     अतिग्रे  तालुका हातकणंगले  येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये विद्यामंदिर अतिग्रे येथे वार्षिक स्नेहसंमेलन व विद्यार्थी पारितोषिक कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला या शाळेमध्ये इयत्ता पहिली ते सातवीचे वर्ग भरतात या लहान चिमुकल्याने आपली भारतीय संस्कृती जपणारी कला अत्यंत उत्कृष्टपणे सादर केली .

प्रथमतः प्रमुख पाहुण्यांचे स्वागत विद्या मंदिर शाळेचे मुख्याध्यापक श्री भोसले सर व सर्व शिक्षक स्टाफ यांनी गुलाब पुष्प देऊन फेटे बांधून स्वागत केले या कार्यक्रमाचे अध्यक्ष अतिग्रे ग्रामपंचायतचे लोकनियुक्त सरपंच माननीय श्री सुशांतजी वडु साहेब होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यामंदिर शाळेचे शिक्षक श्री कोठावळे सर यांनी केले तसेच ज्या विद्यार्थ्यांनी कलेमध्ये , क्रीडा मध्ये, शैक्षणिक मध्ये, यश प्राप्त केले त्या गुणवंत विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक देऊन सत्कार करण्यात आला या कार्यक्रमांमध्ये बोलत असताना सरपंच यांनी सांगितले की ही जिल्हा परिषद शाळा ही आपली आहे माझे शिक्षण येथे झाले आपण हि सर्व पालकांनी आपल्या मुलांना या जिल्हा परिषद शाळेमध्ये शिक्षणासाठी घालावे या जिल्हा परिषद शाळेमध्ये आता सध्या भरपूर सुविधा आहेत व इथून पुढे ही शाळा डिजिटल शाळा बोलकी शाळा सर्व वर्गामध्ये संगणक याची सुविधा पुरविण्यात येईल असे सांगण्यात आले 

    या कार्यक्रमात उपस्थित हातकणंगले पोलीस उपनिरीक्षक माननीय पाटील मॅडम, अतिग्रे उपसरपंच श्री भगवान पाटील, सदस्य बाबासाहेब पाटील, राजेंद्र कांबळे, अनिरुद्ध कांबळे, नितीन पाटील, सौ कलावती गुरव, सौ छाया पाटील, सौ कल्पना पाटील, सौ दिपाली पाटील, श्रीमती अक्काताई शिंदे, सौ वर्षा बिडकर,माजी ग्रामपंचायत सरपंच श्री श्रीधर पाटील, श्री पांडुरंग पाटील, अतिग्रे पोलीस पाटील सौ रूपाली पाटील मॅडम, ग्रामविकास अधिकारी श्री बाबासाहेब कापसे,माजी ग्रामपंचायत सदस्य धनाजी पाटील, रुकडी केंद्रप्रमुख श्री शशिकांत पाटील सर, अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ जिल्हाध्यक्ष श्री जयवंत पाटील सर, सचिन कोल्हापुरे सर, राजमोहन पाटील सर, विजय कांबळे सर, सुखदेव पाटील सर, सामाजिक कार्यकर्ते सचिन पाटील, अमर पाटील,

 पत्रकार भरत शिंदे, विद्या मंदिर शाळेचे मुख्याध्यापक सर्व शिक्षक स्टाफ, शालेय व्यवस्थापन कमिटीचे   अध्यक्ष, उपाध्यक्ष, सर्व सदस्य  ‌, विद्यार्थी पालक वर्ग उपस्थित होते शेवटी आभार श्री माने सर यांनी मानले

Post a Comment

Previous Post Next Post