अकोल्यात सोमवारी २६२ पदांसाठी रोजगार मेळावा

 फेब्रुवारी २१, २०२५ अकोल्यात सोमवारी २६२ पदांसाठी रोजगार मेळावा


प्रेस मीडिया लाईव्ह :

चंद्रशेखर पात्रे :

अकोला, दि. २१ :  जिल्ह्यातील उमेदवारांना खासगी क्षेत्रातील नोकरीच्या संधी उपलब्ध व्हाव्यात म्हणून जिल्हा कौशल्य विकास व रोजगार केंद्रातर्फे अकोला इंडस्ट्रीज असोसिएशनच्या सहकार्याने पं. दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा दि. २४ फेब्रुवारी रोजी होणार आहे.                                                                                                                                                                            मेळाव्यात विविध नामांकित कंपन्यांतील १७० पदे भरली जाण्याबरोबरच मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेत ९२ पदांसाठी इंटर्नशीपची संधीही मिळणार आहे. औद्योगिक वसाहतीत अप्पू पुतळा परिसरातील अकोला इंडस्ट्रीज असोसिएशनच्या सभागृहात हा मेळावा सकाळी ११ ते दु. २ या वेळेत होईल.                                                                                                                              टारगेट सेक्युरिटी कंपनीत सुरक्षा कर्मचा-याची १५ (शैक्षणिक पात्रता किमान १२ वी उत्तीर्ण, वयोमर्यादा २१ ते ४५ वर्ष),  भारतीय जीवन विमा निगममध्ये विमा सखींची ३० (वयोगट २५ ते ६५, शैक्षणीक पात्रता १२ वी), पिपल ट्री ऑनलाईनमध्ये केअरटेकरची २० पदे (वय २१ ते २९, पात्रता एनएनएम, जीएनएम), तसेच मशिन ऑपरेटरची २० पदे (वय १८ ते ३०, किमान १२ उत्तीर्ण) भरली जातील. 

 छ. संभाजीनगर येथील नवभारत फर्टिलायझर्समध्ये क्षेत्रीय अधिका-याची ३५ पदे (वयोमर्यादा १८ ते २८, दहावी, बारावी किंवा पदवीधर), तसेच कृषी अधिका-याची १५ पदे (वय २१ ते २१ ते ३५, कृषी पदविका किंवा पदवी) भरली जातील. ब्ल्यू डार्ट कुरिअर सर्व्हिसमध्ये डिलिव्हरी बॉयची १० पदे (वय १८ ते ३०, किमान १२ वी), तर बॅक ऑफिस मदतनीस (वय १८ ते ३०, पदवी, संगणक ज्ञान) अशी २० पदे भरली जातील. पुण्याच्या जॉन डिरे कंपनीत प्रशिक्षणार्थ्यांची २० पदे (वयोमर्यादा १८ ते २४, मेकॅनिकल, ऑटोमोबाईल, प्रॉडक्शन, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स यापैकी कुठलीही पदविका) भरली जाणार आहेत.  

मेळाव्यात www.rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळाला भेट देऊन लॉगइन आय डी व पासवर्डचा वापर करुन सहभाग नोंदवता येईल. 

त्याचप्रमाणे, मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेत १८ ते ३५ वयोगटातील ९२ उमेदवारांना (एएमएम, जीएमएम, बारावी, पदविका, आयटीआय, पदवीधर अशा विविध अर्हता) ओझोन मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल, आयकॉन मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल, वॉसटॉक इंडस्ट्रीज, गुजराज अंबुजा एक्स्पोर्ट लि.,  साईराज अॅग्रो इंडस्ट्रीज, प्राजक्ता अॅग्रो मशिनरी, गोदावरी लाईफ सायन्स आदी कंपन्यांत प्रशिक्षणाची संधी उपलब्ध आहे. महास्वयम संकेतस्थळाला भेट देऊन आपल्या इंटर्न लॉगिनमधून सहभाग नोंदवता येईल.  

 इच्छूकांनी २४ फेब्रुवारी रोजी शैक्षणिक कागदपत्रे, बायोडेटा व छायाचित्रांसह अकोला इंडस्ट्रीज असोसिएशनच्या सभागृहात स्वखर्चाने उपस्थित राहून संधीचा लाभ घ्यावा. काही अडचण आल्यास (०७२४) २४३३८४९ किंवा ८९८३४१९७९९ या भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन सहायक आयुक्त प्रफुल्ल शेळके यांनी केले.


०००

Post a Comment

Previous Post Next Post