मौजे मढी पाथर्डी येथील मुस्लिम द्वेष दाखवणाऱ्या सरपंच व ग्रामसेवक यांच्यावर गुन्हा दाखल करा... फिरोज मुल्ला (सर) मुख्य संघटक महा. राज्य

अहिल्यानगर जिल्हाधिकारी  यांना रिपाई (सचिन खरात गट ) पक्षाचे निवेदन 


प्रेस मीडिया लाईव्ह :

फिरोज मुल्ला सर :

अहिल्यानगर.. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (सचिन खरात गट ) पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. सचिनभाऊ खरात यांच्या आदेशानुसार मुख्य संघटक महाराष्ट्र राज्य फिरोज मुल्ला (सर )यांच्या नेतृत्वाखाली अहिल्यानगर जिल्हाधिकारी साहेब यांना निवेदन देण्यात आले यावेळी संदीपभाऊ शेंडगे, फिरोजभाई शेख अन्य मान्यवर उपस्थित होते 

मढी ग्रामसभेने मौजे मढी पाथर्डी  येथे मार्च महिन्यामध्ये दरवर्षी होणाऱ्या यात्रेत मुस्लिम फेरीवाले व दुकानदार यांच्यावर बंदी घालण्याचा ठराव करण्यात आला सदर ठराव असंवैधानिक असून भारतीय लोकशाहीचे उल्लंघन करणारा असून सदर ठरवामुळे मुस्लिम द्वेष पसरविण्याचे कृत्य केले असल्याने या प्रकरणी ग्रामसेवक आणि सरपंच यांच्यावर भारतीय दंड संहिता अनुसार गुन्हे दाखल करण्यात यावे या यात्रेमध्ये वर्षानुवर्षं सर्व जातीधर्माचे लोक सहभागी होत असतात मढी देवस्थानाला नाथ व सुफी संप्रदायची परंपरा आहे शेकडो वर्ष लोक एकोप्याने या यात्रेत सहभागी होतात सर्वधर्म समभाव जोपासणारे हे ठिकाण आहे मात्र मुस्लिम समाजाकडून पशुहत्या करणे, अमलीपद्धार्थ विकतात तसेच अवैध धंदे त्यांच्याकडून केले जात असल्याचे कारण देवून त्यांना बंदी ग्रामसभेच्या वतीने घालण्यात आले मात्र वरील अनेक अवैध धंदे हिंदू समाजातील अनेक नागरिक करत नाही का? यावर मात्र सदर ग्रामसभा मूग गिळून गप्प बसते

मढी ग्रामसभेचा ठराव मुस्लिम नागरिकांचे व्यवसाय करण्याचे स्वतंत्र्य नाकारत असून बंदी घातल्याने त्यांना उदरनिर्वाहापासून वंचीत करणारा अन्यायकारक निर्णय आहे ग्रामपंचायतिचा हा निर्णय एकांगी व जातधर्म द्वेषातुन घेतला असल्याचे दिसत आहे मढी ग्रामपंचायतने स्पष्टपणे भारतीय संविधानाच्या विरोधात केलेले कृत्य असून ग्रामपंचायत अधिनियमचा देखील भंग केला आहे

या गंभीर प्रकरणाची सखोल    चौकशी करून ग्रामसेवक अनिल सूर्यभान लवांडे व सरपंच संजय मरकड यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी सदरील ठराव आपल्या अधिकाराखाली रद्द करण्यात यावा अन्यथा आम्हाला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (सचिन खरात गट )या पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन केले जाईल असे निवेदन देताना इशारा देण्यात आला

Post a Comment

Previous Post Next Post