प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापूर- जादा सोने देण्याचे आमिष दाखवून श्रीमती ऐश्वर्या मृणाल माने या महिलेची 10 लाख 90 हजारांची फ़सवणूक केल्या प्रकरणी जयश्री मोहन माजगांवकर (वय 55.रा.बाळू मामा गल्लीच्या मागे ओटीएम गल्ली,खतकर यांच्या घरी भाड्याने,संभाजीनगर ,को.) यांच्यावर राजारामपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.याची फिर्याद.श्रीमती ऐश्वर्या मृणाल माने (वय 50.एसएससी बोर्डच्या मागे सम्राटनगर ,राजारामपुरी,को.) यांनी दिली.हा प्रकार दि.14/12/2023 ते 18/02/2025 या कालावधीत सम्राटनगर येथे घडला होता.
यातील फिर्यादी आणि संशयीत महिला यांची तोंड ओळख आहे.या संशयीत महिलेने श्रीमती ऐश्वर्या माने यांचा विश्वास संपादन करून त्यांच्या कडुन वेळोवेळी रोखीने 3 लाख 30 हजार रुपये आणि 7 लाख 20 हजार रुपये किमंतीचे दागीने याच्यासह 40 हजार रुपये किमंतीचा मोबाईल असा एकूण 10 लाख 90 हजारांची फसवणूक केली.संशयीत महिलेने माने यांना मी सोने खरेदी करणार असून त्यातील थोडे सोने देण्याचे आमिष दाखवले होते.आपली फसवणूक झाल्याचे समजताच त्यांनी संशयीत जयश्री माजगांवकर या महिलेच्या विरोधात मंगळवार (दि.18फ़ेब्रु.)रोजी राजारामपुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिल्याने जयश्री माजगांवकर यांच्या पोलिसांनी फसवणूकीचा गुन्हा दाखल करून अटक केली आहे. पोलिसांनी आज या संशयीत महिलेस न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने 24 फ़ेब्रु.पर्यत पोलिस कोठडी सुनावली आहे.