प्रेस मीडिया लाईव्ह :
कोडोली ता , पन्हाळा जि कोल्हापूर यशस्वी फौंडेशन फाउंडेशनचा उद्घाटन सोहळा यशस्वी फौंडेशन अध्यक्षा सौ विनिता जंयत पाटील यांच्या हस्ते झाले काल थाटात संपन्न झाला.
यशस्वी फौंडेशन आयोजित दख्खन महोत्सव दि 17 ते 21 जाने पर्यंत कोडोली दत्तमठ्ठी येथे भरविला जातो यामध्ये महिलांचा सर्वांगीण विकास हा महत्वाचा उद्धेश असतो या साठी यशस्वी फौंडेशनच्या मा सौ विनिता जयंत पाटील अध्यक्षा - यशस्वी फौंडेशन कोडोली यांनी परिसरात महिलांना हक्काच व्यासपीठ मिळावा व आर्थिक रोजगाराची संदी मिळावी त्यांचे आरोग्य तपासणी , त्यांच्या सुप्त गुणांना वाव मिळण्यासाठी सांस्कृतिक कार्यक्रम, पाककृती , बाल संस्कार शिबिर , सामाजिक कार्य करणाऱ्या व्यक्तिचा गौरव ' शार्ट फिल्म फेस्टीव्हल अशा विविधतेने नटलेला पाच दिवसाचा हा दख्खन सोहळा पाहण्यासाठी कोडोली व त्याला लागून असणारी गावातील लोंकाची गर्दी होते वेगवेगळे स्टाल खाद्यपदार्थ , वेग वेगळ्या वस्तू , मुलांना आकर्षित करणारे आकाश पाळणे असल्यामुळे आर्थिक उलाढाल चांगली होते
अशा या सोहळ्याचे उद्घाटन सायंकाळी 4 वाजता यशस्वी फौंडेशन अध्यक्षा सौ विनिता जंयत पाटील यांच्या हस्ते झाले याप्रसंगी डॉ जयत पाटील , आईसाहेब पद्मजा पाटील यशस्वनी फौंडेशन च्या संचालिका पत्रकार बंधु प्रेस मीडिया लाईव्हच्या संपादिका सौ प्रमोदिनी माने मॅडम अनिता पाटील मॅडम उपस्थित होत्या