मुंबई २६/११ हल्ल्यातील दहशतवादी तहव्वूर राणाचा ताबा भारताला मिळणार?.

 सहा अमेरीकीसह १६६ नागरिकांचे गेले होते जीव अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने दिला 'हा' निर्णय.


प्रेस मीडिया लाईव्ह :

चंद्रशेखर पात्रे :

मुंबई २६/११च्या दहशतवादी हल्यात अमेरीकीच्या सहा नागरिका सह १६६ लोकांचे जीव गेले होते आणि संपुर्ण देश हादरून गेले होते. मुंबईवर झालेल्या २६/११ हल्ल्यातील दहशतवादी तहव्वूर हुसैन राणा याचा ताबा अमेरिकेकडून भारताला मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. मुंबई दहशतवादी हल्ल्यात दोषी आढळलेला तहव्वूर राणा सध्या लॉस एंजल्स येथील तुरूंगात आहे.मुंबईवर झालेल्या २६/११ हल्ल्यातील दहशतवादी तहव्वूर हुसैन राणा याचा ताबा अमेरिकेकडून भारताला मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. मुंबई दहशतवादी हल्ल्यात दोषी आढळलेला  तहव्वूर राणा सध्या लॉस एंजल्स येथील तुरूंगात आहे. अमेरिकेतील सुप्रीम कोर्टाने तहव्वूर राणा याला भारताकडे सोपवण्यासाठी हिरवा कंदील दाखवला आहे.

मुंबईत झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील प्रमुख आरोपी आणि लष्कर-ए-तोयबाचा दहशतवादी डेव्हिड हेडलीशी त्याचे संबंध असल्याचा आरोप राणावर आहे.

तहव्वूर राणा हा मुंबईवरील हल्ल्याचा मास्टरमाईंड डेव्हिड हेडलीचा बालपणीचा मित्र आहे. डेव्हिड हेडली सोबत मुंबईवर हल्ला घडवून आणण्याच्या आणि हल्ल्याची योजना आखल्याच्या आरोपाखाली तहव्वूर राणा दोषी आढळला होता. मुंबई हल्ल्यातील सहभागाप्रकरणी तो शिक्षा भोगत होता. तहव्वूर हुसैन राणा याच्या ताबा भारताकडे सोपवण्याचे अमेरिकेतील कोर्टानं मंजुरी दिली होती. मात्र राणाने अमेरिकेच्या सुप्रीम कोर्टात याचिकेद्वारे या निर्णयाला आव्हान दिले होते. राणाने केलेली याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली. राणा याचं अमेरिकेकडून भारताला प्रत्यार्पण करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. मात्र हे प्रत्यार्पण कधी होणार हे निश्चित नाही. 

"कोण आहे तहव्वूर हुसैन राणा" 

तहव्वूर राणाचा जन्म पाकिस्तानात झाला. तसेच त्याचे शिक्षण देखील पाकिस्तानात झाले होते. थोड्या काळासाठी त्याने पाकिस्तानी सैन्यात डॉक्टर म्हणून सेवा दिली. त्यानंतर तो कॅनडाला गेला. तिथे इमिग्रेशन सेवांमध्ये विशेषज्ञ म्हणून कार्यरत झाला. तो कॅनडाचा नागरिक आहे. तहव्वूर राणा हा लष्कर-ए-तैयबाचा दहशतवादी डेव्हिड हेडलीचा बालपणीचा मित्र आहे. हेडली सोबत मुंबईवर हल्ला घडवून आणण्याची योजना आखण्यात राणाचा सहभाग होता. या आरोपाखाली २०१३ मध्ये दोषी आढळला होता. अमेरिकन कोर्टाने त्याला १४ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली होती. तहव्वूर राणा  सध्या लॉस एंजल्स येथील तुरूंगात आहे.

२००८ साली झालेल्या मुंबईवर दहशतवादी हल्ल्यात (२६/११) सहा अमेरिकन लोकांसह एकूण १६६ लोक मारले गेले होते. दहा पाकिस्तानी दहशतवाद्यांनी ६० तासांहून अधिक काळ मुंबईला वेठीस धरले होते. मुंबईच्या प्रतिष्ठित आणि महत्त्वाच्या ठिकाणी हल्ले करून लोकांची हत्या केली होती.

Post a Comment

Previous Post Next Post