प्रेस मीडिया लाईव्ह :
अभिनेता सैफ अली खानवर झालेल्या हल्ल्यातील मुख्य आरोपी विजय दास याला मुंबई पोलिसांनी रविवारी पहाटे ठाणे पश्चिम भागातून अटक केली. हा आरोपी कांदळवनाच्या जंगलात लपून बसला होता . झोन सहाचे डीसीपी नवनाथ ढवळे आणि कासारवडवली पोलिसांच्या पथकाने संयुक्तपणे आरोपीला अटक केली. मुंबई पोलिसांनी पत्रकार परिषद घेत आरोपी कसा सापडला याची माहिती दिली आहे.
बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान याच्यावर हल्ला करणाऱ्या आरोपीचा पोलिस गेल्या दोन दिवसांपासून शोध घेत होते. आरोपी हा कांदळवन जंगलात लपून बसला होता. हल्लेखोराने काही सेकंदासाठी आपला मोबाईल सुरू केला आणि फासला. पोलिसांना कांदळवनाच्या जंगालात त्याच्या हालचाली दिसल्या. यानंतर हिरानंदानी इस्टेट परिसारातील दाट कांदळवनाच्या जंगलात त्याचा शोध घेण्यात आला व आरोपी पोलिसांच्या जाळ्यात अडकला. शोध घेतला आणि हा हल्लेखोर सापडला.
डीसीपी दीक्षित गेडाम यांनी पत्रकार परिषद दिलेल्या माहितीनुसार सैफवर हल्ला करणाऱ्या आरोपीचं नाव मोहम्मद शरीफउल इस्लाम शहजाद (वय ३०) आहे. हा आरोपी बांग्लादेशी असून तो गेल्या सहा महिन्यांपासून मुंबईत वास्तव्यास आहे. तो एका हॉटेलमध्ये काम करत होता. सैफ अली खानवर जीवघेणा हल्ला केल्यावर आरोपी हा फरार झाला होता. तो त्या दिवशी दादरला गेला व लोकलने वांद्रे येथे आला. त्यानंतर तो सेंट्रल लाईनच्या दिशेने गेला. त्याच्या फोनचे शेवटचे लोकेशन हे ठाणे दिसलं. पोलिसांनी रात्रीच्या वेळी जंगलाच्या भागात सुरू असलेल्या मोबाईल फोनचा डेटा एकत्र केला. आरोपीकडे फोन असल्याचे एका सीसीटीव्हीत पोलिसांना आढळलं होतं. तो रात्री फोन सुरू करायचा. सैफच्या घरातून आरोपी पळल्यावर त्याने कुणाशी तरी फोनवरून बोलण केलं. त्यानंतर त्याने फोन बंद केला. तसेच दादर रेल्वे स्टेशनला सकाळी पोहोचल्यावर फोन सुरू केला. त्यानंतर पुन्हा फोन बंद केला.
दरम्यान, तो घोडबंदर येथील हिरानंदानी इस्टेट भागात असलेल्या एका कामगारांच्या छावणीत लपून असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. मुंबई आणि ठाण्यातील कासारवडवली पोलिसांची पथकाने या ठिकाणी त्याचा शोध घेतला. परंतु तो फरार झाला. पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण केले तेव्हा तो कांदळवन जंगल परिसरात लपून असल्याचं दिसलं. याच वेळी हल्लेखोराने मोबाईल सुरू केला. त्यामुळे त्याचं ठिकाण पोलिसांना समजलं. पोलिसांनी सापळा रचून त्याला अटक केली.
बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानवर हल्ला केल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी एका व्यक्तीला अटक केली आहे. ही व्यक्ती बांगलादेशी असून वेगवेगळ्या नावाने मुंबईत राहत असल्याचा संशय मुंबई पोलिसांना आहे. त्या व्यक्तीकडून मिळालेली माहिती आणि साहित्याच्या आधारे पोलिसांनी याबाबत संशय व्यक्त केला आहे. मुंबई पोलिसांनी रविवारी प्रसारमाध्यमांशी बोलताना ही माहिती दिली. झोन 9 चे डीसीपी दीक्षित जैनदम यांनी सांगितले की, एफआयआर नोंदवून त्या व्यक्तीला अटक करण्यात आली आहे आणि तो दरोड्याच्या उद्देशाने सैफ अली खानच्या घरात घुसला होता.
डीसीपी दीक्षित गेडाम यांनी माध्यमांना सांगितले की, "१६ जानेवारी रोजी रात्री २ वाजता अभिनेता सैफ अली खानवर त्याच्या घरात आरोपीने हल्ला केला. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे. मोहम्मद शरीफुल इस्लाम शहजाद असे त्याचे नाव असून आहे. दरोड्याच्या उद्देशाने तो सैफच्या घरात घुसला. त्याला न्यायालयात हजर केले जाणार असून कोठडीची मागणी केली जाणार आहे. पुढील तपास नंतर केला जाईल. तो बांगलादेशी असल्याचा संशय आहे. त्या व्यक्तीकडे पुरेशी भारतीय कागदपत्रे नव्हती.
बांग्लादेशी असल्याचा संशय ....
प्राथमिक पुराव्यांच्या आधारे आरोपी बांगलादेशी असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. त्याच्याकडे वैध भारतीय कागदपत्रे नाहीत. काही वस्तू जप्त करण्यात आल्या आहेत ज्यावरून तो बांगलादेशी नागरिक असल्याचे दिसून येते. त्याने स्वत:चे नाव विजय दास ठेवले होते. तो ५-६ महिन्यांपूर्वी मुंबईत आला होता. काही दिवस तो मुंबईत राहिला आणि नंतर आजूबाजूच्या परिसरात काही ठिकाणी त्याने काम केले. आरोपी एका हाऊसकीपिंग एजन्सीमध्ये कामाला होता. आरोपी विजय दास, बिजॉय दास अशी अनेक नावे वापरुन आपली ओळख लपवत होता.