प्रेस मीडिया लाईव्ह :
अध्यापक महाविद्यालय अरणेश्वर येथील 42 छात्राध्यापक व तीन प्राध्यापक मिळून प्लास्टिक मुक्त शिवनेरी संकल्प करून शिवनेरी गडावर 18 किलो प्लास्टिक जमा केले गडावर प्लास्टिक नेण्यासाठी बंदी असली तरी वेगवेगळ्या खाण्याचे रॅपर्स पाण्याच्या बाटल्या व वेगवेगळ्या प्रकारचे सिंगल युज प्लास्टिक पर्यटक गडावर घेऊन जातात व आसपासच्या परिसरात फेकून देतात यातून गडाचे पावित्र्य व सौंदर्य कमी होते.
यावर उपाय म्हणून अध्यापक महाविद्यालयातील प्राचार्य बी जी चौगुले यांच्या मार्गदर्शनाखाली अध्यापक महाविद्यालयातील ग्रीन क्लब ने प्लास्टिक मुक्त शिवनेरीचा संकल्प करून शिवनेरी गडावर श्रम संस्कार शिबिराचे आयोजन करण्यात आले या अंतर्गत 42 छात्राध्यापक व प्रा. सुनील कालेकर डॉ.शुभांगी कुऱ्हाडे व ग्रीन क्लबचे कॉर्डिनेटर प्रा.योगेश पाटील यांच्या मार्गदर्शनांतर्गत श्रमसंस्कार शिबिराची मोहीम राबवण्यात आली. याचबरोबर गडाचे पावित्रेने सौंदर्य अबाधित राहावे यासाठी छात्राध्यापकांकडून प्लास्टिक विरोधी जनजागृती करण्यात आली.