बांबरवाडी व कन्या घोसरवाड मध्ये पत्रकार दिन संपन्न.

 


प्रेस मीडिया लाईव्ह :

दत्तवाड : प्रतिनिधी :

विद्या मंदिर बांबरवाडी,दत्तवाड शाळेत केंद्रप्रमुख संजय निकम यांनी शिरोळ तालुका प्रसिद्धी प्रमुख दिलीप शिरढोणे यांना पत्रकार दिनानिमित्त शुभेच्छा देवून कार्याचा गौरव केला. याप्रसंगी अध्यापक निलेश माने व विद्यार्थी उपस्थित होते.

           दरम्यान कन्या विद्या मंदिर घोसरवाड येथे केंद्रप्रमुख संजय निकम व मुख्याध्यापक रमेश शंकर कोळी यांचे हस्ते शालेय विभागातील उपक्रम,घडामोडींना प्रसिध्दी देवून शिक्षक व विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करण्याचे कार्य करणाऱ्या तालुका प्रसिद्धी प्रमुख दिलीप शिरढोणे यांचा यथोचित गौरव करण्यात आला. 

          या प्रसंगी हिंदूराव फासके,रमेश मारुती कोळी,गुंडा परीट,ज्योती परीट,खुरपे मॅडम,कुटवडे मॅडम उपस्थित होत्या.

Post a Comment

Previous Post Next Post