जिल्हास्तरीय कबड्डीत कन्या हेरवाड अजिंक्य. जल्लोषी मिरवणूक ;कौतुकाचा वर्षाव.

 



प्रेस मीडिया लाईव्ह :

दत्तवाड : प्रतिनिधी : जंहाॅंगीर रणमली          

  कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या वतीने आयोजित जिल्हास्तरीय अध्यक्ष चषक क्रीडा स्पर्धा २०२४-२०२५ वरीष्ठ गट मुलींच्या गटात कबड्डी मध्ये कन्या विद्या मंदिर हेरवाड ता.शिरोळ अजिंक्यपद पटकाविले. ३५ किलो वजनी गट कुस्तीमध्ये कु.आरोही हळाळे हिने विजेतेपद मिळविले.या ऐतिहासिक कामगिरीबद्दल ग्राम पंचायत,शाळा व्यवस्थापन समिती,पालक,शिक्षकवृंद व ग्रामस्थ यांच्यावतीने विजयी कन्यांची जल्लोषी मिरवणूक काढण्यात आली. सुवासिनींनी मुलींचे औक्षण केले.

           जिल्हा परिषदेच्या वतीने घेण्यात येणाऱ्या अध्यक्ष चषक क्रीडा स्पर्धेतील कबड्डीमध्ये गतवर्षी अपयश मिळाले होते.या वर्षी कोणत्याही परिस्थितीत अजिंक्यपद मिळवायचेच या इराद्याने मैदानात उतरलेल्या जिगरबाज मुलींनी चित्तथरारक खेळाने सर्वांची मने जिंकत यश मिळविले. ग्रामपंचायत सदस्य संतोष चिंदरकर व कुस्ती प्रशिक्षक संजय देबाजे यांचे अनमोल मार्गदर्शन लाभले.

              ऐतिहासिक यश मिळविणारे खेळाडू पुढीलप्रमाणे -संचिता दिनकर माळी,आदिती अरविंद पाटील,ऋतुजा राहूल बरगाले,सलोनी श्रीकांत वाघे,भूमिका बसगोंडा पाटील,देवयानी किरण नेर्ले,साक्षी संदिप बत्ते,अंजली संजय सौदे,सृष्टी शशिकांत बरगाले,समीक्षा सचिन कांबळे,समृद्धी रमेश स्वामी,पूर्वा सुनिल घोलप.

         या खेळाडूंना प्रेरणा व प्रोत्साहन गट विकास अधिकारी नारायण घोलप व गट शिक्षण अधिकारी सौ.भारती कोळी यांचे प्रोत्साहन लाभले.

         याप्रसंगी शिक्षण विस्तार अधिकारी अनिल ओमासे,केंद्र प्रमुख संजय निकम,केंद्रसमन्वयक सुभाष कुरुंदवाडे,सरपंच रेखा जाधव,माजी सरपंच वसंतराव देसाई,सुरगोंडा पाटील,चंद्रकला पाटील,ग्रामपंचायत सदस्य हयातचांद जमादार,छाया सुर्यवंशी,विजयमाला पाटील,छाया गायकवाड,विद्या माने,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष रमजान नदाफ व सर्व सदस्य,अर्जुन जाधव,विकास माळी,कृष्णा पुजारी,उत्तम सुतार,लियाकत चाँदखान,दिलीप शिरढोणे,सुभाष तराळ मुख्याध्यापक व सर्व शिक्षक वृंद,पालक,ग्रामस्थ,विद्यार्थिनी उपस्थित होते.

चौकट:

ऐतिहासिक कबड्डी स्पर्धेतील अजिंक्य पद मिळाल्याचा आनंद काही औरच होता.मुख्याध्यापक,शिक्षक व विद्यार्थिनींनी छत्रपती शिवाजी महाराज चौकात हलगीच्या तालावर ठेका धरला.

Post a Comment

Previous Post Next Post