श्री दत्त सहकारी साखर कारखाना शिरोळ येथील कार्यस्थळावर ऊसतोड मजूर आरोग्य तपासणी व उपचार शिबिर संपन्न झाले.

 


प्रेस मीडिया लाईव्ह :

शिरोळ दत्तनगर : प्रतिनिधी: 

बुधवार दिनांक 8 जानेवारी 2025 रोजी श्री दत्त सहकारी साखर कारखाना शिरोळ येथील कार्यस्थळावर  ऊसतोड मजूर आरोग्य तपासणी व उपचार शिबिर संपन्न झाले. यावेळी दत्त उद्योग समूहाचे चेअरमन श्री गणपतराव पाटील साहेब यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन झाले. 

सर्व मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.यावेळी दत्त  सहकारी साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक श्री एम व्ही पाटील साहेब, तालुका आरोग्य अधिकारी पंचायत समिती शिरोळ डॉ पी आर खटावकर साहेब, सहाय्यक जिल्हा हिवताप अधिकारी श्री जे के कांबळे साहेब,  श्री दत्त साखर कारखाना चॅरिटेबल ट्रस्ट चे आरोग्य व शिक्षण संचालक अंबाप्रसाद नानिवडेकर, दत्त कारखाना संचालक श्री शेखर पाटील साहेब, जिल्हा हिवताप कार्यालय कडील आरोग्य निरीक्षक  श्री पी एस पवार, श्री अशोक थैल  व आरोग्य सेवक श्री जावेद मुल्ला उपस्थित होते. दत्त कारखाना आरोग्य केंद्राचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ कुमार पाटील साहेब , त्यांचे सहकारी श्री श्रीकांत निर्मळे (MPW)  प्राथमिक आरोग्य केंद्र  घालवाड चे वैद्यकीय अधिकारी डॉ डोने सर, प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी  श्रीमती डी डी शेटे मॅडम,आरोग्य सहाय्यक श्री जमीर नदाफ, आरोग्य सेवक श्री राजेश भांडवले, श्री सुनील कांबळे, श्री दीपक नाजिरकर, गटप्रवर्तक व सर्व आशा यांनी सदर शिबिरासाठी  परिश्रम घेतले.

 जीवनकल्याण चॅरिटेबल ट्रस्ट इचलकरंजी यांचे डॉ सुमित पाटील व अलायन्स मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचे डॉ. धनश्री पाटील सदानंद गायकवाड ऑनलाइन टीम डॉ व त्यांच्या सहकाऱ्यानी बहुमोल सहकार्य केले. स्वागत व प्रास्ताविक श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखाना चॅरिटेबल ट्रस्ट संचलित आरोग्य केंद्राचे प्र मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ कुमार पाटील यांनी केले तर सूत्रसंचालन आशा गट प्रवर्तक सौ सीमा पाटील मॅडम यांनी केले. मोफत आरोग्य शिबिरामध्ये विविध जिल्ह्यातून आलेल्या ऊसतोड मजुरांनी मोठ्या संख्येने लाभ घेतला.

Post a Comment

Previous Post Next Post