प्रेस मीडिया लाईव्ह :
भारतात 60 वर्षे पूर्ण झालेल्या प्रत्येक नागरिकाला सरकारकडून एक खास ओळख मिळते, ती म्हणजे ज्येष्ठ नागरिक कार्ड हे कार्ड फक्त एक ओळखपत्र नाही, तर ज्येष्ठ नागरिकांना विविध सुविधा आणि सवलतींचा लाभ घेण्याचा अधिकार देते.ज्येष्ठ नागरिक कार्ड काय आहे?
ज्येष्ठ नागरिक कार्ड हे सरकारकडून जारी केलेले एक अधिकृत दस्तऐवज आहे, जे 60 वर्षांपेक्षा अधिक वयाच्या नागरिकांना त्यांची ओळख सिद्ध करण्यासाठी वापरता येते. हे कार्ड त्यांना विविध सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी मदत करते.
कार्ड मिळवण्यासाठी काय करावे..?
पात्रता: 60 वर्षे पूर्ण झालेले आणि भारत देशाचे नागरिक असणे.
कागदपत्रे: वयाचा पुरावा (जन्म प्रमाणपत्र, पासपोर्ट), ओळख पुरावा (आधार कार्ड, मतदार ओळखपत्र), पत्ता पुरावा (वीज बिल, रेशन कार्ड) आणि पासपोर्ट आकाराचा फोटो.